तुमच्या कृतीकडे लक्ष द्या

Print Friendly, PDF & Email
तुमच्या कृतीकडे लक्ष द्या
उद्देश:-

हा उपक्रम, शब्द आणि कृती एकाच वेळी घडणे याचे जे महत्व आहे त्यावर भर देतो. दोन्हींमधील विसंगती इतरांना चुकीचे मार्गदर्शन करते.

संबंधित मूल्ये:-
  • एकाग्रता
  • सावधानता
  • जागरूकता
खेळ कसा खेळावा:-
  1. गुरूंनी वर्गाला स्पष्ट करून सांगावे की मुलांनी जे हातवारे करायचे आहेत ते गुरूंच्या आज्ञेनुसार असावेत आणि गुरूंच्या हातवाऱ्यांनुसार नसावेत.
  2. गुरूंनी हा खेळ अजून स्पष्ट करून सांगावा.
  3. जेव्हा गुरु -साईराम- म्हणतील तेव्हा मुलांनी दोन्ही हात वर करून हातांचे तळवे स्वतःकडे करावेत.
  4. तर जेव्हा गुरु -राधेश्याम- म्हणतील तेव्हा मुलांनी दोन्ही हात वर करून हातांचे तळवे बाहेरच्या बाजूला करावेत.
  5. सर्वप्रथम गुरु दोन्ही नावे आळीपाळीने म्हणत जातील (उदा. साईराम- राधेश्याम).
  6. परंतु गुरु हळूहळू आपल्या म्हणण्याचा वेग वाढवत जातील आणि- साईराम, राधेश्याम, राधेश्याम, राधेश्याम, साईराम असे कसेही म्हणू शकतील.
  7. गुरुंचे हातवारे त्यांच्या आज्ञेनुसार असतीलच असे नाही आणि या मुद्यावरच भर दिला पाहिजे.
  8. खेळ सुरु होतो. मुले बहुतांशी त्यांना जे सांगितले आहे त्यापेक्षा त्यांना जे दिसते त्याचेच अनुकरण करतात असे लक्षात येते.
  9. खेळ चालू राहतो आणि जी मुले गुरूंच्या आज्ञेविरुद्ध हातवारे करतात ती एक एक करून खेळातून बाहेर होतात. जो शेवटपर्यंत बाहेर जात नाही तो जिंकतो.
गुरूंना सूचना:-
  • वर्गातील चर्चा- मुलांची धाकटी भावंडे आपले मोठे बहीण-भाऊ जे करतात त्याचेच अनुकरण करतात (खेळामधून सिद्ध झाल्याप्रमाणे). म्हणून आपल्या धाकट्या भावंडाना सल्ला देण्याआधी मोठ्यांनी स्वतःच्या कृतीबाबत सावध असावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *