शब्द स्ट्रिंग

Print Friendly, PDF & Email

शब्द स्ट्रिंग

उद्दिष्ट:

मुलांची एकाग्रता वाढवून, त्यांना संकल्पनेशी संबंधित शब्दांची दीर्घ मालिका लक्षात ठेवण्यास सक्षम बनवणे हे ह्या खेळाचे उद्दिष्ट आहे.

संबंधित मूल्ये-
  • लक्ष केंद्रित करणे
  • स्मरणशक्ती
  • आत्मविश्वास
खेळ कसा खेळावा:
  1. गुरुंनी मुलांना गोलाकारात बसवावे.
  2. गुरुंनी वर्गामध्ये खेळाची संकल्पना घोषित करावी. (उदा. -भगवान शिव)
  3. गुरुंनि मुलांना खेळाविषयी समजावून सांगावे.
  4. पहिल्या मुलाने भगवान शिवाशी संबंधित एक शब्द सांगावा. (उदा.- शंकर)
  5. दुसऱ्या मुलाने ‘शंकर’ हा शब्द म्हणून त्यामध्ये अजून एक शब्द जोड़ावा. (उदा. शंकर + कैलास)
  6. तिसऱ्या मुलाने पहिले दोन शब्द उच्चारून त्यांत भगवान शिवाशी संबंधित अजून एक शब्द जोडावा (उदा. शंकर+कैलास+पार्वती)
  7. एखाद्या मुलास आधीचे शब्द न आठवल्यास वा त्याचा स्वतःचा शब्द पुढे न जोडता आल्यास खेळ थांबवावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *