‘गु’ म्हणजे अंधःकार आणि ‘रु’ म्हणजे नाहीसा करणारा. गुरु म्हणजे जो अंधःकार नाहीसा करतो. लोकांनी, सर्वांना सामावून घेणाऱ्या प्रेमतत्त्वानी आपली मने भरुन घ्यायला हवीत. प्रेमाचा पूर्णत्वाने अनुभव घेण्यासाठी तुम्ही हृदय पूर्णतः प्रेमाने भरुन टाकले पाहिजे. पूर्ण भक्तिची ती परिणती असेल. गुरुचा अजून एक अर्थ आहे. ‘गु’ म्हणजे गुणातीत (ज्या त्रिगुणांनी विश्व बनले आहे त्या त्रिगुणांच्या पलीकडे) आणि ‘रु’ म्हणजे रूपवर्जित, रूपरहित (कोणतेही विशिष्ट रूप रहित) आता कोणीही मर्त्य गुणातीत व रूपातीत नसतो, केवळ परमेश्वर ह्या सर्वांपासून अप्रभावित असतो असे आपण म्हणू शकतो. तुमच्या हृदयात विद्यमान असणारा, तुम्हाला मार्गदर्शन करणारा, ज्ञान देणारा परमेश्वर हाच गुरु होय. तो सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी आहे. —– बाबा
गुरु परम आत्मा आहे. जो भक्ताच्या अज्ञानाचा अंधःकार दूर करतो आणि त्याला इंद्रिये आणि मन ह्यांचे नियमन करण्यास शिकवतो. सांसारिक बेड्यांमधून मुक्त झाल्यावर, मनुष्याला अंतर्यामीचे दर्शन होऊ शकते.
आपले जगद्गुरु भगवान श्री सत्यसाई बाबांची, ही गुरुभजने गाऊन प्रार्थना करुया.