ओंकारं बिंदू
ऑडिओ
श्लोकाचे बोल
- ओंकारं बिन्दु संयुक्तं
- नित्यं ध्यायन्ति योगिनः
- कामदं मोक्षदं चैव
- ओंकाराय नमो नमः
अर्थ
तपस्वी लोक नेहमी बिंदुसाहित ओंकाराचे ध्यान करतात. जो आमच्या इच्छा पूर्ण करतो आणि आम्हाला मोक्षही देतो, त्या शाश्वत ओंकाराला आम्ही पुनः पुन्हा नमस्कार करतो. (बिन्दुसहित लिहिला जाणारा ओंकार असे सुचवितो, ज्या ओंकारापासून आपण सर्व आलो आहोत, त्या ओंकाराचे आपण बिंदु आहोत).
मुक्ती – सर्व निर्मिती (ही सृष्टी) माझ्यापेक्षा वेगळी आहे व माझ्याशी संबंध नसलेली आहे या भ्रांतीतून (भ्रमातून) आम्हाला मुक्त कर.
व्हिडिओ
स्पष्टीकरण
ओंकारं बिन्दु संयुक्तं | चंद्र व बिन्दु या सह लिहिलेला ૐ |
---|---|
नित्यं | रोज, सतत |
ध्यायन्ति | ध्यान करतात |
योगिनः | संत, तपस्वी – योगी म्हणजे अशी व्यक्ती, जी सर्व प्राणीमात्रात भगवंताचे अस्तित्व मानणारी असते |
काम | इच्छा |
दं | देते, प्रदान करते |
मोक्षदं | मोक्ष देणारा, मायेचा नाश करणारा. मोक्ष याचा अर्थ, बाबा मोहक्षय असा करतात. |
चैव | आणि |
ओंका राय नमो नमः | मी त्या ओंकाराला पुनःपुन्हा नमस्कार करतो |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 4
-
उपक्रम
-
पुढील वाचन