ओका चिन्न कथा (एक छोटीशी कथा) ह्या तीन तेलगू शब्दांनी त्यांचे ओघवते प्रवचन थांबवतात तेव्हा सर्व श्रोत्यांचे कान टवकारतात, हृदये सतर्क होतात. जेव्हा ते त्यांच्या प्रवचनांमधून ह्या कथा आणि बोधकथा सांगतात, त्या त्यांच्या प्रेमाच्या नभोमंडलात पक्षांच्या थव्यांसारख्या विहार करत असतात आणि त्यातील काही कथा त्यांच्या अनुमतीने आपल्या हृदयात प्रवेश करतात आणि जोपर्यंत आपण प्रेमाने त्यांचे पोषण करून त्यांना विचार प्रणाली व वर्तन प्रणाली बनवतो तोपर्यंत त्या आपल्या हृदयात घर करून राहतात.
[संदर्भ- प्रशांती निलयम संक्रांती 14.1.1978, के. एन. कस्तुरी]
भगवानांनी त्यांच्या प्रवचनांमधून सांगितलेल्या चिन्न कथा प्रेरणादायी आणि उन्नत करणाऱ्या असतात. मुलांना आकर्षित आणि प्रेरित करण्यासाठी त्या कथा बालविकासच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे त्या कथांमधील उच्च नैतिक मूल्यांसहित ते हे जीवन व्यतीत करतील. ह्या कथा मनुष्याच्या मनावर आणि हृदयावर कायमचा ठसा उमटवतात. विविध आध्यात्मिक सत्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी भगवान बाबा नेहमी चिन्न कथा सांगत असत. त्यामुळे सर्वांना ते समजणे सोपे जाई. भगवानांनी त्यांच्या विविध प्रवचनांमधून नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांचे धडे देणाऱ्या काही चिन्न कथा या विभागात दिल्या आहेत.
बालविकास गुरुंनी संदर्भासाठी कथा भाग १ व २ ही पुस्तके वापरावीत आणि आपापल्या वर्गातील मुलांचे वय आणि समज लक्षात घेऊन त्यानुसार त्या पुस्तकांमधील कथा वर्गांमध्ये सांगाव्यात