पोषक अन्न आणि पोषणमूल्य विरहित अन्न – संगीत खुर्ची खेळ
हा खेळ सुरु करण्यापूर्वी गुरुंनी मुलांबरोबर अन्न आणि खाण्याच्या सवयी ह्या विषयांवर चर्चा करावी.
ह्याचर्चेमध्ये खालील महत्त्वाच्या मुद्यांचा समावेश असावा;
- खाण्यागोदर जर तुम्ही हात स्वच्छ धुतले नाहीत तर हातावरील धूळ तुमच्या पोटात जाते व तुम्ही आजारी पडता.
- तुमची आई तुमच्यासाठी पोषक व शुद्ध, स्वच्छ अन्न बनवते त्यामुळे तुम्ही आरोग्यपूर्ण व शक्तिशाली आहात.
- ती तुम्हाला शुद्ध व उकळलेले पाणी पिण्यास देते.
- शुद्धता व निटनेटकेपणामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते.
- आपण सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळे खाल्ली पाहिजेत.
- आपण जंक फ़ूड (पोषणमूल्यांचा अभाव असलेले अन्न) व फ़ास्ट फ़ूड (पिज्जा,बरगर ई) खाण्याचे टाळले पाहिजे.
- अन्न ग्रहण करण्यापूर्वी परमेश्वरास अर्पण केले की त्याचा प्रसाद बनतो.
- पोषक व आरोग्यदायी भाज्या व फळे ह्याविषयी समजावून सांगताना तक्त्याचा वापर करावा.
साहित्य – तक्ता, स्केच पेन किंवा मार्कर, खुर्च्या, म्यूजिक सिस्टम (उपलब्ध नसल्यास गुरु भजन म्हणू शकतात)
सिद्धता : तक्त्याचे चार समान भाग कापावेत त्यावर पोषक पदार्थ आणि पोषकमूल्य विरहित पदार्थ लिहावे.
उदाहरण :
- पोषक पदार्थ : भाज्यांचे सूप, दूध, दही, कापलेली फळे, राजमा पुलाव पोळी, कोशिंबीर, छोले (सुंडल), मोड़ आलेली कडधान्ये, कोवळा नारळ (शहाळे) ई.
- पोषणमूल्य विरहित पदार्थ : बर्गर, नूडल्स, टिन मधील अन्नपदार्थ, शीतपेय ई.
हा खेळ संगीतखुर्चीसारखाच आहे. ह्यामध्ये खुर्च्यांची संख्या भाग घेणाऱ्या मुलांच्या संख्ये इतकी असते प्रत्येक खुर्चीखाली पोषक वा पोषणविरहित अन्नपदार्थाचे नांव लिहिलेली पाटी उलटी ठेवलेली असते। संगीत सुरु झाल्यावर मुले चालू किंवा पळू लागतात व संगीत थांबल्यावर खुर्चीत बसतात. पोषणविरहित अन्नपदार्थाची पाटी ज्या मुलाच्या खुर्चीखाली असेल तो आउट होतो. खेळ पुढे सुरु राहतो
टिप – तक्त्यातील पाट्यांची संख्या मुलांच्या संख्ये एवढी असावी