आरोग्य आणि आरोग्यशास्त्र
आरोग्य – आजारपण व इजेपासून मुक्त असलेली देहाची अवस्था / स्थिती, अशी आरोग्याची व्याख्या करतात.
आरोग्यशास्त्र – म्हणजे अशी स्थिती व आचरण ज्यायोगे शरीराचे स्वास्थ्य टिकून राहते आणि विशेषतः स्वच्छता राखून रोगांना प्रतिबंध करते.
निरोगी जीवनासाठी सूचना – आपल्या शरीराची आस्थेने व दक्षतेने काळजी घेतली पाहिजे . ही एक मौल्यवान भेट आहे. हे एक गुंतागुंतीचे पण योग्य समन्वय असलेले यंत्र असून प्रशंसनीय कार्य करण्यासाठी ते आपल्याला मिळाले आहे . त्याची बाह्य इंद्रिये स्वच्छ ठेवलीच पाहिजेत. आणि चांगुलपणाच्या मोहकतेने ती परिपूर्ण असायला हवी.