दिलेल्या माहितीतून समूह बनवणे
उद्दिष्ट:
आवश्यकतेनुसार दिलेल्या माहितीमधून समूह बनवण्याची मुलांमध्ये क्षमता वाढवणे.
संबंधित मूल्ये:
- निवड करणे
- विविधतेत एकता
- चांगले पाहाणे
- सुव्यवस्था
समान नवे उपक्रम तयार करण्यासाठी गुरुंना मार्गदर्शन:
खाली दिलेले उदाहरण धर्माच्या चिन्हासंबंधी आहे. अशाप्रकारे वेगवेगळ्या विषयांवर गुरु उपक्रम करु शकतात. उदा.
- पंचमहाभूते
- राष्ट्रचिन्हे (५)
- इच्छांवर नियंत्रण (पैसा, ऊर्जा,वेळ, अन्न, पाणी)
- ५ डी – (कर्तव्य, भक्ती, शिस्त, निश्चय, विवेक)
- पाच मानवी मूल्ये
- स्वातंत्र्यसैनिक (५)
- रामायणातील पाच व्यक्तित्वे
- सण (उत्सव) ५- रमझान, नौरोज, ईस्टर, गुरुपर्व, दसरा
- संत- (५- प्रत्येक राज्यातील)
- संस्थापक- (५- येशु बुध्द आणि इतर)
शक्यतो मुलांना अधिक मनोरंजक होण्यासाठी चित्रांचा उपयोग करावा, जसे चिन्हे दाखवता येतात.
खेळ कसा खेळावा
४५ चिन्हे देऊन, मुलांनी त्यांचे ९ समूह करावे. असे करताना प्रत्येक समूहात ५ धर्मांची चिन्हे असावीत.