श्री सत्य साई सुप्रभातम
व्हिडिओ
ऑडिओ
श्लोकाचे बोल अर्था बरोबर
-
ईश्वराम्बासुत श्रीमन्
पूर्वा संध्या प्रवर्तते ।
उत्तिष्ठ सत्यसाईश
कर्तव्यं दैव दैवमाह्निकम् ।।
हे ईश्वराम्मासुत, दैवी उदात्त पुत्रा, पूर्वेकडे सूर्योदय होत आहे. नित्याची दैवी कामे तुम्हाला करावयाची आहेत. म्हणून हे सत्य साई प्रभू, जागे व्हा.
-
उत्तिष्ठोत्तिष्ठ पर्तीश
उत्तिष्ठ जगतीपते ।
उत्तिष्ठ करुणापूर्णा
लोकमंगल सिद्धये ।।
जागे व्हा, जागे व्हा, पर्तीच्या देवा. सर्व जगाच्या परमेश्वरा जागा हो. हे कल्याणपूर्ण प्रभू. मानवतेच्या कल्याणासाठी जागा हो.
-
चित्रावती तट विशाल सुशान्त सौधे:
तिष्ठन्ति सेवक जनास्तव दर्शनार्थम्।
आदित्य कान्तिरनुभाति समस्त लोकान्
श्री सत्य साई भगवन्, तव सुप्रभातम्।।
चित्रावतीच्या किनार्यावर असलेल्या, प्रशांतीने युक्त अशा भव्य महालाच्या भोवती तुझ्या दर्शनासाठी सेवक जन थांबले आहेत. सूर्याचा प्रकाश पसरत आहे आणि जगाला प्रकाशित करीत आहे. आमचे दिव्यत्वाचे ज्ञान जागृत होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो.
-
त्वन्नामकीर्तनरतास्तव दिव्यनाम
गायन्ति भक्ति रसपान प्रहृष्टचित्ता:|
दातुं कृपासहितदर्शनमाशु तेभ्यः
श्री सत्य साई भगवन् तव सुप्रभातम्।।
लोक तुमची भजने मोठ्या प्रेमाने गात आहेत व आनंदनिर्भर अंतःकरणाने भक्तीच्या अमृताची चव चाखत आहेत. तुमचे दर्शन त्यांच्यावर तात्काळ कृपावर्षाव करो. हे प्रभू, भगवान श्री सत्य साई, ह्या शुभ प्रभातीस (मंगल प्रभातीस) मी तुम्हाला वंदन करतो.
-
आदाय दिव्यकुसुमानि मनोहराणि
श्रीपादपूजनविधिं भवदंघ्रि मूले।
कर्तुं महोत्सुकतया प्रविशन्ति भक्ता:
श्री सत्य साई भगवन् तव सुप्रभातम्।।
भक्त सुंदर रंगांची पवित्र फुले घेऊन शास्त्रविधीनुसार आपल्या कमलचरणांची पूजा करण्यासाठी आपल्या पायाशी येत आहेत. ते मोठ्या उत्साहाने व उत्कंठेने येतात. हे प्रभू, भगवान श्री सत्य साई, ह्या शुभ प्रभातीस (मंगल प्रभातीस) मी तुम्हाला वंदन करतो.
-
देशान्तरागत बुधास्तव दिव्यमूर्तिं
संदर्शनाभिरतिसंयुतचित्त वृत्त्या।
वेदोक्त मंत्र पठनेन लसन्त्यजस्त्रं
श्री सत्य साईं भगवन् तव सुप्रभातम्।।
अन्य देशातील शिक्षित जण आपल्या दर्शनासाठी आले आहेत. त्यांना आपल्या दैवी शरीराचे (आकाराचे) दर्शन घेण्याची फार उत्कंठा आहे. त्यांना वेदांमधील मंत्रांचे उच्चारण करण्यात आनंद मिळतो. हे प्रभू, भग वान श्री सत्य साई, ह्या शुभ प्रभातीस (मंगल प्रभातीस) मी तुम्हाला वंदन करतो.
-
श्रुत्वा तवाद्भुत चरित्रमखंकीर्तिम्
व्याप्तां दिगन्तरविशालधरातलेऽस्मिन्।
जिज्ञासुलोक उपतिष्ठति चाश्रमेऽस्मिन्
श्री सत्यसाई भगवन् तव सुप्रभातम्।।
तुमच्या आश्चर्यकारक कथा ऐकून आणि क्षितिजापलीकडे दूरवर पसरलेली तुमची कीर्ती ऐकून सत्याचा शोध घेणारे जिज्ञासू आश्रमात आले आहेत आणि तुमच्या दर्शनाची आणि अंतर्जागृतीची वाट पाहात आहेत. हे प्रभू, भगवान श्री सत्य साई, ह्या शुभ प्रभातीस (मंगल प्रभातीस) मी तुम्हाला वंदन करतो.
-
सीतासतीसम विशुध्दहृदम्बुजाता:
बह्वंगनाः करगृहीतसुपुष्पहाराः।
स्तुन्वन्ति दिव्यनुतिभिः फणिभूषणं त्वां
श्री सत्यसाई भगवन् तव सुप्रभातम्।।
ज्यांची हृदये कमळाप्रमाणे अलिप्त, जगाबाबत अनासक्त आहेत, ते सीतेप्रमाणे शुद्ध भक्त तुमच्याकडे ओढले गेले आहेत. तुमची दैवी स्तुती गात आहेत. त्यांनी तुम्हाला अर्पण करण्यासाठी सुंदर फुलांचे हार आणले आहेत. गळ्याभोवती सर्प असणारा शिव त्यांचा देव आहे. हे प्रभू, भगवान श्री सत्य साई, ह्या शुभ प्रभातीस (मंगल प्रभातीस) मी तुम्हाला वंदन करतो.
-
सुप्रभातमिदं पुण्यं, ये पठन्ति दिने दिने।
ते विशन्ति परंधाम, ज्ञान विज्ञान शोभित:।।
जो कोणी या सुप्रभातम् (जागृत स्तोत्र) चे नित्य पठण (श्रद्धा व भक्ती पूर्ण) करील तो सर्वोच्च स्थान (ध्येय) प्राप्त करील. उच्च तेजस्वी ज्ञानाने तो युक्त होईल आणि सर्वोच्च शहाणपणा त्याला प्राप्त होईल.
-
मंगलं गुरु देवाय, मंगलं ज्ञानदायिने |
मंगलं पर्तिवासाय, मंगलं सत्यसाईने ||
आमचे सद्गुरू आमचे मंगल करू देत. ते आम्हाला दिव्य शहाणपण देऊ देत. पुट्टपर्तीत अवतरलेले आमचे गुरु आमच्यावर कृपा करू देत. सद्गुरू श्री सत्य साईंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 12
-
उपक्रम
-
पुढील वाचन
- दुपाती तिरुमलाचार्यांबद्दल स्वामींचे मनोगत
- सुप्रभातम – प्रस्तावना
- श्री सत्य साई सुप्रभातम (कडवे १)
- श्री सत्य साई सुप्रभातम कडवे २
- श्री सत्य साई सुप्रभातम (कडवे ३)
- श्री सत्य साई सुप्रभातम (कडवे ४)
- श्री सत्य साई सुप्रभातम (कडवे ५)
- श्री सत्य साई सुप्रभातम (कडवे ६)
- श्री सत्य साई सुप्रभातम (कडवे ७)
- श्री सत्य साई सुप्रभातम (कडवे ९)
- श्री सत्य साई सुप्रभातम (कडवे १०)