सतत जोडलेले रहा – (बी ऑनलाइन )
उद्देष:
सामाजिक कौशल्ये आणि समन्वय या गोष्टी प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत आवश्यक असून या उपक्रमातून त्यांचा विकास होण्यास मदत होते.
संबंधित मूल्ये:
- प्रश्न सोडवणे
- निर्णय घेणे
- वेळेचे व्यवस्थापन
तयारी:
- वर्गात असणाऱ्या मुलांची संख्ये इतकी पत्रके गुरुंनी तयार करावीत
- प्रत्येक पत्रकावर रामायणातील एका व्यक्तीचे नाव लिहावे. (उदा. – जानकी, शबरी, कौसल्या, वाली, बिभीषण, वाल्मिकी, शत्रुघ्न, मंथरा, कैकयी, मंदोदरी इत्यादी)
How to Play
- पत्रके, पिसून त्यातील एक एक पत्रक एका एका मुलाच्या हातात गुरु देतील.
- वर्गातील मुलांचे दोन गट केले जातील व गुरु त्यांना खेळ कसा खेळायचा याबद्द्ल माहिती देतील.
- प्रत्येक गटातील मुलांनी आपल्या पत्रिकेवरील नावाप्रमाणे त्याच्या अद्याक्षराप्रमाणे ओळीने रांगेत पत्रक घेऊन उभे रहायचे.
- जो गट अद्याक्षराप्रमाणे ओळीत उभा राहील, तसेच कमीत कमी वेळात उभा राहील त्याला गुण मिळतील
(उदा- उत्तर-न दशरथ, जानकी, कैकयी, कौसल्या, मंदोदरी, मंथरा , शबरी, शत्रुघ्न, वाली, वाल्मिकी, विभीषण)
बदल:
पत्रकांवर संतांची, थोर पुरुष आणि स्त्रियांची नावे लिहिता ये
गुरुंसाठी सूचना:
उपक्रमाची कठीणता-पातळी वाढविण्यासाठी एकाच अक्षराने सुरु होणारे अनेक शब्द वापरता येतील.