सावकाश चालवा सुरक्षित पोचा
उद्देष:
पेन्सिल आणि नाणे ह्यांचा खेळ, मजेने भरलेला उपक्रम असून यात गुरुत्व, तराजू, प्रमाणबध्दता आणि दृश्य डोळ्यासमोर आणणे.
संबंधित मूल्ये:
- एकाग्रता
- संयम
- स्थिरता
- निर्धार
- प्रश्न सोडवणे
आवश्यक साहित्य:
- दहा एक रुपयाची सारख्या आकाराची नाणी
- एक पेन्सिल एका टोकाला सपाट.
- मोठ्या बटाट्याचा अर्धा तुकडा
- ताटली
- स्टॉपवॉच
कसे खेळायचे:
- गुरुंनी मुलांना खेळ समजावून सांगणे.
- प्रत्येक मुलाने त्याच्या तातलीत अर्धा कापलेला बटाटा ठेवायचा.
- मुलाने पेन्सिलच्या टोकाकडून पेन्सिल बटाट्यात खुपसायची (पेन्सिल स्टैंड सारखे दिसेल)
- दहा नाणी एकावर एक अशी सावकाश पेन्सिलच्या सपाट टोकावर ठेवायची
- असे करताना काही नाणी खाली पडली तरी मुले पुढे लावायचा प्रयत्न करु शकतात.
- हा खेळ सगळ्या मुलांनी एकाच वेळी गुरु सांगतील तेव्हा सुरु करायचा आहे.
- जो प्रथम दहा नाणी दिलेल्या वेळात लावून’पूर्ण करेल तो विजेता.
संबंधित वाक्प्रचार, वचने
- अती घाईने सारे मुसळ केरात
- संयम आणि स्थिर बुद्धीने शर्यत जिंकता येते.
- घाईने आमटीसुद्धा बिघडते.