मानवी (पिरॅमिड) शंकूच्या आकाराचा मनोरा
उद्देष:
गट बोधणीसाठी उत्कृष्ट उपक्रम. यात नाविन्य आणि चापल्य मुलांकडून अपेक्षित आहे
संबंधित मूल्ये:
- सतर्कता
- संघ सशक्तीकरण
- मनाची उपस्थिती
- पुढाकार
तयारी:
शब्द सूची – पिरॅमिड, फूली, त्रिशूळ, चांदणी स्वस्तिक, डमरु, वृक्ष, चंद्र, पर्वत, बासरी इत्यादी
कसे खेळायचे
- गुरुने त्यांच्या सुचितून शब्द जोरत सांगयचा (उदा. पिरॅमिड)
- सगळ्या मुलांनी एकत्र येऊन मानवी पिरॅमिड त्यांचा त्यांनी करायचा.
- या पिरॅमिडमध्ये प्रत्येक मुलाचा सहभाग असला पाहिजे.
- हा खेळ, सूचीतील शब्द, गुरु सांगतील तो पर्यंत विविध आकार करत खेळत रहायचा.
गुरुंसाठी सूचना:
प्रत्येक आकार करुन झाल्यावर त्या संबंधित प्रश्न गुरुंनी विचारावेत