श्री सत्यसाई अष्टोत्तरी
उद्देश:
या उपक्रमात मुलांना साई अष्टोत्तरीतील नावे ओळीने आठवून जोरात म्हणून दाखवण्याची संधी मिळेल. हे म्हणताना त्यांना गंमतपण वाटेल.
संबंधीत मूल्ये:
- भक्ती
- स्मरणशक्ती
- सतर्कता
- संघ भावनेमध्ये वृद्धी
आवश्यक साहित्य:
एक चेंडू
गुरुंची तयारी:
काहीही नाही
कसे खेळावे
- गुरु मुलांना गोलात उभे करेल आणि एका मुलाच्या हातात चेंडू देईल.
- ज्या मुलाच्या हातात चेंडू आहे त्याने साई अष्टोत्तरीतील प्रथम नाम मोठ्या आवाजात म्हणून चेंडू दुसऱ्या मुलाचे नाव घेत त्याच्याकडे फेकायचा.
उदा. ॐ श्री भगवान सत्यसाई बाबाय नमः - दुसऱ्या मुलाने चेंडू पकडत दुसरे नाम ॐ श्री साई सत्यस्वरुपाय नमः म्हणावे
- पुढे त्याने तिसऱ्याकडे चेंडू फेकायचा
- हा खेळ जेवढा वेळ खेळण्यास उपलब्ध आहे तो पर्यंत ओळीने योग्य नावे घेत खेळत रहायचा.
- ज्या मुलाला किंवा मुलीला योग्य नाव म्हणता येणार नाही तो खेळातून बाद होईल.
गुरुंसाठी सूचना:
- हा उपक्रम मुलांसाठी त्यांचा अभ्यास वाढवण्यासाठी गुरुंना उपयुक्त होईल.
- हा उपक्रम अजून मनोरंजक करण्यासाठी मुलांना दहा नावांची सूची पाठ करुन म्हणायला सांगता येऊ शकते. त्याने त्यांचे परिक्षण करण्यास सोपे जाईल.