“जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा नाम घेता,तेव्हा रूपातील माधुर्य आणि त्याच्याशी निगडित त्याचा महिमा तुमच्या स्मरणात यायला हवा.तुम्हाला आवडणाऱ्या एखाद्या गोड पदार्थची आठवण झाल्यावर जसे तुमच्या तोंडाला पाणी सुटते तसेच जेव्हा तुम्ही त्याचे चिंतन करता तेव्हा तुमच्या मनाला पाणी सुटले पाहिजे. जे नाम तुमच्या मनाला मोहित करते ते नाम तुम्ही निवडा. धनदौलतीतून मिळणाऱ्या सुख समाधानाच्या तुलनेत, जर नामस्मरणातून शतपटीने अधिक सुख समाधान मिळू शकत असेल तर धनदौलतीच्या मागे का धावायचे? भगवंताने म्हटले आहे की जेथे त्याचे स्तुतीगान केले जाते, “तत्र तिष्ठामी” तेथे तो स्वतःला स्थानापन्न करतो, तेथे तो तिष्ठतो. त्याला जिंकण्यासाठी शुद्ध मनाची भाषा बोलणारी जिव्हा पुरेशी आहे.”- बाबा
आपण सर्वजण मिळून अढळ श्रद्धेने आणि अत्यंत प्रेमाने ही नारायण भजने गाऊन दिव्यत्वाला साद घालूया.