श्री सत्यसाईबाबांनी म्हटले आहे की मौनाच्या गहिऱ्या शांततेत ईश्वराचा आवाज ऐकू येणे शक्य आहे.
स्तब्ध बैठकीची प्रक्रिया म्हणजे आपल्या स्वत्वाशी तादात्म्य साधणे.
या प्रक्रियेमुळे आपल्या अंतरंगातील चैतन्य बाहेर प्रकट होते. दिव्यत्वाला आपल्यामध्ये प्रस्थापित करून, आपण त्याला आपल्या जीवनाचा मार्गदर्शक करतो ज्यामुळे बुद्धीद्वारे मनाच्या लहरींवर देखरेख करून आपण त्याचे व्यवस्थापन करू शकतो. जर विचारांची गुणवत्ता चांगली असेल तर मनही चांगले राहील.
लहान मुलांची प्रथम फक्त एक किंवा दोन मिनिटे शब्द बैठक घ्यावी त्यानंतर हळूहळू कालावधी वाढवावा. स्तब्ध बैठकीचा घरीही नियमित सराव करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्याला निश्चित जाणवेल की नियमित आणि मनापासून स्तब्ध बैठक करणाऱ्या मुलांची अस्थिरता कमी होते आणि ती शांत होतात. हळूहळू त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते स्वतःच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात.
मुलांचे वय आणि क्षमता विचारात घेऊन, स्तब्ध वेळेचा सराव वर्गाच्या सुरुवातीस तसेच शेवटीही घेता येईल. हे स्तब्धता आणि श्रवण याविषयी आहे, विशेषतः अंतर्मनाचा आवाज ऐकणे आणि अंतर्मनातील भाव जाणणे. पुढे काही मूल्याधिष्ठित स्तब्ध बैठकीची उदाहरणे दिली आहेत.