आरोग्य व आरोग्यशास्त्र कार्यक्रमाअंतर्गत गट १ च्या बालविकास मुलांकरता शिकवण्यासाठी ठळक मुद्दे.

Print Friendly, PDF & Email
आरोग्य व आरोग्यशास्त्र कार्यक्रमाअंतर्गत गट १ च्या बालविकास मुलांकरता शिकवण्यासाठी ठळक मुद्दे.

  • झोप – लवकर निजे, लवकर उठे, त्यांस आरोग्य, ऐश्वर्य आणि शहाणपण मिळे.
  • पुरेशी झोप मिळाल्याने एकाग्रता वाढण्यास मदत होते.
  • चांगल्या झोपेसाठी रात्री झोपण्यापूर्वी प्रार्थना म्हणावी.
  • व्यायाम – शक्य तेवढं बाहेर खेळलं पाहिजे.
  • संगणकावर जास्त वेळ खेळत बसू नका. व तासंतास दूरदर्शन पाहत बसू नका.
  • चांगल्या योग प्रशिक्षकांकडून सोपी योगतंत्र शिका.
  • योग्य आहार घ्या. – आरोग्यासाठी चांगला व संतुलित आहार घ्या.
  • गोड पदार्थ व चॉकलेट जास्त खाऊ नका. शीतपेये पिऊ नका.
  • त्याऐवजी फळें व भाज्या खा, दूध प्या, फळांचा ताजा रस घ्या.
  • नाश्ता करणे टाळू नका.
  • अन्न वाया घालवू नका.
  • अन्न चांगले चावून खाणे महत्वाचे आहे.
  • टेबलवर बसून जेवताना शिष्टाचार महत्वाचे असतात. जेवताना ताटाभोंवती व इतरत्र अन्न सोडू नये.
  • जेवताना मौन पाळले पाहिजे.
  • तोंडात घास असतांना कधीही बोलू नये.
  • खाताना कधीही मचमच आवाज करू नये
  • तोंड बंद ठेवून अन्न खाल्ले पाहिजे.
  • खाण्यापूर्वी अन्न देवाला प्रसाद म्हणून अर्पण करावे.
  • पाणी – नेहमी स्वच्छ, उकळलेले व आवश्यक तेवढे पाणी प्यावे.
  • शरीराची स्वच्छता राखावी – ‘ देहो देवालयं ‘, देह देवाचे मंदिर होय.
  • रोज स्नान करावे. जर आपण नियमितपणे स्नान केले नाही, तर घामाबरोबर बाहेरची धूळ आपल्या त्वचेला चिटकून राहील आणि त्यामुळें त्वचा रोग होतील. शरीराला दुर्गंधी येईल आणि कोणालाही आपली सांगत आवडणार नाही.
  • चांगल्या स्नानासाठी भरपूर पाणी आणि साबण वापरला पाहिजे. तसेच स्नान करतांना त्वचा नीट घासून स्वच्छ केली पाहिजे.
  • स्नानानंतर देह पुसण्यासाठी स्वच्छ टॉवेल वापरावा. नियमितपणे व रोज स्नान करण्याची आवश्यकता व महत्व गुरूंनी मुलांना पटवून दिले पाहिजे.
  • प्रार्थना – जसें देहाच्या स्वच्छतेसाठी स्नान महत्वाचे, तसें मनाच्या स्वच्छतेसाठी नियमित प्रार्थना करण्याचे महत्वाचे ठरते.
  • केसांची स्वच्छता – नियमितपणे केस धुतले पाहिजेत.
  • तसेच रोज तेल लावून व विंचरून केसांची निगा राखली पाहिजे; ते नीटनेटके ठेवले पाहिजेत व केसांचे उवांपासून रक्षण केले पाहिजे.
  • दातांचे आरोग्य – आपण आपले दात नियमितपणे व योग्य पद्धतीने घासले पाहिजेत.
  • अन्न दांतात अडकते व कांही वेळाने ते कुंजू लागते, त्यामुळें आपल्या श्वासालाही दुर्गंधी येते. कुजल्याने जंतु निर्माण होतात व लवकरच दातांना संसर्ग होऊन ते पडतात. दातांशिवाय आपण अन्न खाऊ शकत नाही. म्हणून रोज सकाळी व रात्री दात घासले असतां ते स्वच्छ राहतील व त्यांना चमक येईल.
  • आपण नियमितपणे दंतवैद्यांकडे जाऊन दातांची तपासणी केली पाहिजे.
  • नखें – नखें नियमितपणे कापली पाहिजेत व स्वच्छ ठेवावी. नखें चावू नयेत.
  • हातांची स्वच्छता – जेवणापूर्वी व नंतर, तसेच स्वच्छतागृहांचा उपयोग केल्यानंतर आणि प्राण्यांना हाताळल्यानंतर हात स्वच्छ धुवावे.
  • पायांची निगा – योग्य पादत्राणे घातल्याशिवाय बाहेर जाऊ नये. घराबाहेर खेळल्यानंतर नेहमीच पाय व पाऊले स्वच्छ धुतली पाहिजेत.
  • साबणाने व पाण्याने स्वच्छ धुतलेले कपडे वापरावे.
  • मळलेले व खराब झालेले कपडे ताबडतोब काढून टाकले पाहिजेत व वेगळे घुतले गेले पाहिजेत.
  • डोळ्यांची निगा – स्वच्छ पाण्याने धुवून डोळे स्वच्छ ठेवावे.
  • रात्री झोपण्यापूर्वी डोळे धुणें चांगली सवय आहे. कारण यामुळे दिवसभरांत डोळ्यांत जमलेली धूळ व कचरा निघून जातो.
  • डोळे पुसण्यासाठी नेहमी स्वच्छ कपडा वापरावा.
  • साडी, धोतर किंवा कपड्याच्या बाहीने कधीही डोळे पुंसू नयेत. त्यामुळे डोळ्यांना खूप गंभीर संसर्ग होऊ शकतो व संसर्गाने रोगाचा प्रसार होतो.
  • प्रत्येकाने डोळे पुसण्यासाठी स्वतंत्र कापड, पंचा किंवा हातरुमाल वापरला पाहिजे. जर आधीच एका डोळ्याला संसर्ग झाला असेल, तर प्रत्येक डोळ्यासाठी स्वतंत्र रुमाल वापरावा.
  • कोणताही संसर्ग झाला की वैद्याकडे तपासणी केली पाहिजे. रस्त्यावरील विक्रेत्यांच्या औषधांचा उपयोग करणे टाळावे. कदाचित् त्याचा उपयोग तर होणार नाहीच, पण अंधत्व येऊ शकते.
  • अमरनाथ, अगाथी, पालक, शेवग्याचा पाला यांसारख्या हिरव्या पालेभाज्या आणि पपई, आंबा यासारखी फळे खावी. यांत ‘अ ‘ जीवनसत्व असल्याने रातांधळेपणा रोखता येईल आणि या गोष्टी डोळ्यांसाठी चांगल्या आहेत.
  • मुले जर वाचताना डोकें किंवा डोळें दुखतात अशी तक्रार करत असतील तर त्यांना चष्म्याची गरज आहे. त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन डोळे तपासले पाहिजेत.
  • जेथे वेल्डिंग, ग्राइंडिंग, धार लावणे, टाकी लावणे किंवा लाकूड तपासण्याचे काम चालू असेल, तेथे मुलांनी थांबू नये किंवा त्याकडे जवळून पाहू नये.
  • प्रखर प्रकाशकिरणांच्या उगमाकडे ( उदाहरणार्थ – ग्रहण किंवा वेल्डिंगकडे पाहणे ) योग्य चष्मा घातल्याशिवाय पाहू नये.
  • जर डोळें लाल झाले असतील, तर ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन तपासणे आवश्यक आहे.
  • धारदार वस्तूंशी तुम्ही खेळूं नका कारण तुमच्या डोळ्यांना इजा होऊ शकते.
  • डोळें देवाची देणगी आहे म्हणून फक्त चांगले पाहावे. कानांची निगा –
  • स्नानानंतर तुम्ही तुमच्या आईवडिलांकडून स्वच्छ कापडाने कां पुसून घेतले पाहिजेत.
  • कानात मळ साठल्याने किंवा जंतू संसर्गामुळे कान दुखतो. जर दुखणे थांबले नाही तर डॉक्टरला दाखवले पाहिजे.
  • कान ही सुद्धा ईश्वरी देणगी आहे. कानाने फक्त चांगलेच ऐकावे.
  • घसा व नाकासंबंधी काही समस्या असतील, ( उदाहरणार्थ – घसा खवखवणे, कफ होणे किंवा नाक चोंदणे इत्यादी ) तर यासाठी गरम पाणी प्यावे आणि मिठाच्या पाण्याच्या गुळव्या कराव्या.
  • नाकातून वाफ घेण्याचा ही चांगला उपयोग होतो.
  • खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकून घ्यावे. वापरलेले टिश्यू केराच्या टोपलीत टाकून द्यावे.
  • वरचेवर घसा दुखत असेल, तर त्याच्या तक्रारींसाठी कान, नाक, घसा तज्ञाला भेटा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: