राष्ट्रीय प्राणी – वाघ

Print Friendly, PDF & Email

राष्ट्रीय प्राणी – वाघ

National Animal- Tiger

  • रुबाबदार वाघ (पेंथेरा टिग्रिस) एक पट्टेरी प्राणी आहे. त्याच्या शरीरावर पिवळ्या रंगाचे जाड फरचे आवरण असून गडद रंगाचे पट्टे असतात. डौलदारपणा, ताकद, चपलता आणि प्रचंड शक्ती या गुणांमुळे वाघाने भारताचा राष्ट्रीय प्राणी हे अभिमानाचे स्थान मिळवले आहे.
  • १९७३ च्या एप्रिल महिन्यांत सतत घटत चाललेली भारतातील वाघांची संख्या रोखण्यासाठी “व्याघ्र प्रकल्प” सुरु करण्यात आला. या योजने अंतर्गत आपल्या देशात वाघांसाठी राखीव क़ुरणं तयार करण्यात आली आहेत.
  • आपल्या जीवनातील ध्येय गाठण्यासाठी काम करत असतांना आपण वाघाप्रमाणे जागरूक आणि चपल असले पाहिजे. त्याच्या या गुणांचे अनुकरण केले पाहिजे.
वर्गासाठी सूचक उपक्रम:
  • गुरुंनी वर्गामध्ये निसर्गाचे महत्त्व, प्राण्यांचे संरक्षण आणि श्री सत्य साईं आत्मोद्भव शिक्षणाची संकल्पना याबद्दल चर्चा करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *