The Story of the Birth of Jesus-mr

Print Friendly, PDF & Email

ख्रिसमस

प्रति वर्षी डिसेंबर महिन्यात ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यावेळी ख्रिस्तासाठी केली जाणारी आराधना असते तिला मास (mass) असे म्हणतात. त्यावरून ख्रिसमस हा शब्द आलेला आहे. काही वेळा ह्या शब्दाचे लघुरूप करतात आणि तो ‘xmas’ असे लिहितात. ते अक्षर ग्रीक भाषेतील असून, ग्रीस मध्ये ख्रिस्ताच्या नावाची सुरुवात ह्या अक्षराने होते. आणि पुष्कळदा हे अक्षर पवित्र प्रतीक म्हणून वापरले जाते.

जिझसच्या जन्माची कथा

जीझसचा जन्म होण्यापूर्वी काही दिवस सीझर ऑगस्टरने असे फर्मान काढले की प्रत्येकाने कर देण्यासाठी आपापल्या वाडवडिलांच्या गावी जावे . म्हणून जोसेफ आणि मेरी यांनी नाझारेथ शहराच्या गॅलिलीतून निघून डेव्हिडच्या बेथेलहॅम या ज्युडिआतील शहरापर्यंत प्रवास केला. कारण जोसेफ हा थोर राजा डेव्हिडचा वंशज होता. मेरी लवकरच प्रसूत होणार होती. म्हणून ती एका छोट्या गाढवावर बसून चालली होती व जोसेफ तिच्याबरोबर पायी चालत होता लोकांचे जथेच्या जथे कर भरण्यासाठी त्या नगराकडे लोटत होते आणि सर्व पथिकाश्रम तुडुंब भरले होते जोसेफ व मेरी जागोजागी फिरले तथापि त्यांना कुठेही राहायला जागा मिळेना. शेवटी एका पथिकाश्रमाच्या मालकाला मेरीचा श्रांत चेहरा पाहुन दया आली आणि त्याने त्या उभयतांना मागच्या दारी असलेल्या गोठ्यात निवारा दिला. गोठयातील जनावरांबरोबर त्या निवाऱ्यात ते रात्रभर राहिले. त्या रात्रि मेरीने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला. तिने त्या अर्भकासाठी गव्हाणीत छोटासा बिछाना तयार केला आणि त्याला मोठ्या मार्दवाने कपड्यात गुंडाळून मऊ सुगंधी गवतावर निजविले.

बेथेलहॅमच्या वेशीबाहेर काही मेंढपाळ एका शेतामध्ये शेकोटी पेटवून तिच्याभोवती बसले होते. ते भाग्यवान ठरले कारण त्यांना एक दिव्य दृश्य दिसले. त्यांच्यासमोर एकाएकी एक देवदूत प्रकट झाला व सर्वत्र प्रभूची प्रभा पसरली. प्रथम ते मेंढपाळ घाबरले व एकमेकांना पकडून बसले. पण देवदूत त्यांना म्हणाला, ”घाबरू नका, मी तुम्हाला मोठ्या आनंदाची सुवार्ता सांगायला आलो आहे. सर्व लोकांसाठी ही आनंदवार्ता आहे कारण आज डेविडच्या नगरात सर्व लोकांचा त्राता जन्माला आला आहे. तो प्रभु ख्रिस्त आहे आणि या लक्षणावरुन तुम्ही त्याला ओळखू शकाल, ते मूल कपडयात लपेटून गव्हाणीत निजलेले तुम्हाला दिसेल.” एकदम अनेक देवदूत प्रभूची कीर्ती गात तिथे आले आणि म्हणू लागले. “उच्च स्थानी प्रभूचा गौरव असो.” मेंढपाळ आश्चर्यचकित झाले व एकमेकांना म्हणू लागले “चला आपण बेथेलहॅम मध्ये जाऊया आणि प्रभूने आपल्याला माहीत करुन दिलेली घटना पाहू या.” ते घाईघाईने शहरात गेले आणि त्यांनी सर्वत्र शोध केला. शेवटी त्यांना पथिकाश्रमाच्या मागील गोठा सापडला. त्यांना मेरी, जोसेफ व गव्हाणीत निजलेले मूल दिसले. त्या मुलासमोर त्यांनी आदराने

गुडघे टेकले आणि स्वतः पाहून त्यांना जे सांगण्यात आले होते ते त्यांनी सर्वांना माहित करुन दिले मग देवाच्या दैवी योजनेबद्दल आश्चर्य करीत व देवाची स्तुतिस्तोत्रे गात ते परतले. मेंढपाळांनी जे सांगितले ते मेरीने आपल्या हृदयात ठेवले व त्यावर चिंतन करत राहिली

“ज्यूंचा राजा म्हणून जन्माला आलेला ‘तो’ कुठे आहे? आम्ही पूर्वेत त्याचा तारा उदयाला आलेला पाहिला आणि म्हणून त्याला पूजा करायला आम्ही आलो आहोत.” हेरोड राजाने या गोष्टी ऐकल्या तेव्हा तो खूपच अस्वस्थ झाला .त्याने मुख्य पुरोहितांना व लेखानिकांना बोलावले आणि

विचारले, “शास्त्रांच्या भाकिताप्रमाणे ख्रिस्त कुठे जन्माला येणार आहे? आणि त्यांनी सांगितले, “ज्युडीआच्या बेथेलहॅम मध्ये,” आता हेरोड राजाला मनःशांती राहिली नाही. तो घाबरला होता आणि स्वतःच्या स्थिरतेविषयी भयभीत झाला होते. पूर्वेकडील विद्वानांना इकडे आणणारे हे मूल कोण असेल याचा तो आश्चर्याने विचार करू लागला. त्याने त्या विद्वानांना गुप्तपणे बोलावले व सांगितले, “बेथेलहॅमला जा आणि दक्षतेने बालकाचा शोध घ्या आणि तो सापडला की परत मला संदेश द्या म्हणजे मीही येईन आणि त्याची पूजा करीन.”

राजाचे हे बोलणे ऐकल्यावर ते विद्वान् पुन्हा आपल्या उंटावर स्वार झाले आणि निघाले. त्यांना पूर्वेत जो तेजस्वी प्रकाश दिसला होता तो त्याला पुन्हा दिसला आणि ते खुष झाले. ते त्या प्रकाशाला अनुसरत राहिले. शेवटी त्यांना तो मोठा प्रकाश ख्रिस्त ज्या ठिकाणी होता त्या तिथे केंद्रीत झालेला दिसला. आत प्रवेश केल्यावर त्यानी मेरीपाशी तो बाळ पाहिला व त्यांनी गुडघे टेकून त्याला वंदन केले. मग त्यांनी आणलेल्या भेटवस्तु दिल्या. सुवर्णाची नाणी असलेली एक पेटी आणि बाळाच्या पाय चोळण्यासाठी तेलाचे एक छोटेसे भांडे अशा त्या वस्तु होत्या.

आता त्या विद्वानांना देवाने स्वप्नात सूचना केली की त्यांनी हेरॉडकडे परत जाऊ नये

आणि म्हणून ते दुसऱ्या मार्गाने स्वतःच्या देशाला परतले. ते गेल्यावर जोसेफला एक स्वप्न पडले त्यात एक देवदूत त्याला दिसला आणि म्हणाला “ऊठ , छोटे बाळ आणि आई यांना घेऊन इजिप्तमध्ये पळून जा आणि मी परत सूचना आणी पर्यंत तिथेच रहा कारण हेरॉड मुलाला मारून टाकण्यासाठी शोधणार आहे.” जोसेफ जागा झाला त्याने आपले स्वप्न मेरीला सांगितले आणि त्यांनी पटापटआपले सामान आवरले. . गाढवावर बसलेल्या मेरीने उबदार कपड्यात गुंडाळलेले बाळहृदयाशी धरले आणि अजुन रात्र होती तोच ते वाळवंटी प्रदेशातून दक्षिणेला इजिप्तकडे दीर्घ प्रवासाला निघाले

जेव्हा कित्येक दिवस उलटले आणि विद्वान् मंडळींनी आपल्याला फसविले आहे. असे हेरोडच्या लक्षात आले तेव्हा तो कमालीचा संतापला. “एका अर्भकाला माझे सिंहासन मी बळकावू देणार नाही” तो रागाने चवताळून म्हणाला.त्याचा क्रोध इतका जबर्दस्त होता की त्याने असे फर्मान काढले की बेथेलहॅम व भोवतालचा सागरी किनारा यामध्ये असलेल्या दोन वर्षे व त्यापेक्षा लहान मुलांचा शिरच्छेद करावा. (कारण त्यावेळी तो विद्वानांशी बोलला होता).

हेरोडने देह टाकल्यावर पुन्हा देवदूत इजिप्तमध्ये जोसेफच्या स्वप्नात आला आणि म्हणाला, ”आता मुलाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएलच्या भूमीला परत जा.”

मग त्या छोटया कुटुंबाने परत वाळवंटातून व जंगलातून प्रवास केला .पण या वेळी मेरी आणि जोसेफ आनंदात होते कारण आता बाळाचे जीवित सुरक्षित होते. ते गेलिलीला आपल्या घरी परतले व नाझारेथ शहरात राहू लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *