गट १ मध्ये आरोग्य व आरोग्यशास्त्र कशासाठी :

Print Friendly, PDF & Email
गट १ मध्ये आरोग्य व आरोग्यशास्त्र कशासाठी
  • आरोग्य हे एक कार्य असून, ते फक्त वैद्यकीय बाबतीत दक्षता राखणे नाही, तर आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि मानसिक अंगांनी, एकंदरीत सर्व बाबतीत समाजाची सर्वांगिण प्रगती. आणि त्याला आहार, सभोवतालची परिस्थिती आणि आरोग्यशिक्षणाची जोड मिळाली पाहिजे.
  • अगदी शक्य तेवढ्या लहान वयापासूनच मुलांना आरोग्य व आरोग्यशास्त्राच्या अचूक तत्वांचे शिक्षण व माहिती द्यायला सुरवात केली पाहिजे.
  • यामुळे साथीचा संसर्ग आणि रोग वाढून न देण्यांस मदतच होईल आणि पचनमार्ग, श्वसनमार्ग आणि देहाच्या बाह्य इंद्रियांना इजा न पोहोचता त्यांचे रक्षण होईल.
  • तसेच प्राचीन ग्रंथात म्हटलं आहे, की आपले शरीर म्हणजे संसारसागर तरून नेणारी होडी आहे. आणि सत्कर्म करण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी मिळालेले एक साधन आहे.
  • म्हणून आध्यात्मिक साधनेसाठी चांगले आरोग्य अत्यावश्यक आहे. Balanced diet combined with
    • यासाठी योग्य संतुलित आहार व त्याचबरोबर
    • खाण्याच्या योग्य सवयी
    • चांगली स्वस्थ झोप
    • शारीरिक व्यायाम
    • मानवी शरीराचा आदर
    • वस्तू जागच्या जागी नीट, व्यवस्थित ठेवणे.
    • सर्वंकष, हितकर मानसिक कल असणे.
    • चांगल्या सवयी लावणें.

    – या सर्व गोष्टी चांगल्या निरोगी व निरामय आरोग्य कार्यक्रमाचा अविभाज्य भाग आहेत.

    • – मनाचे उन्नयन आणि आत्म्याला उच्च स्तरावर नेणाऱ्या नीतीच्या गोष्टी व भजने वर्गात घेतल्यानंतर जर लगेच आरोग्य व
      खुशाल जीवनाबद्दल मुलांना मार्गदर्शन केले, तर बालकांच्या मनांत गोष्टी चांगल्या प्रकारे ठसतात.
    • – वर्गात निदान महिन्यातून एकदा असे पाठ घेतले पाहिजेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *