प्रास्ताविक संदेश खाली पारदर्शी करण्यासाठी, मराठीतील (शक्यतो बालविकासशी संबधीत) स्वामींची १० सुवचने आवश्यक आहेत.
मुलांमध्ये मानवी उत्कृष्टतेचे विकसन
भगवान श्री सत्यसाई बाबांनी सक्रिय नैतिक जीवनासाठी, व्यक्तिगत बांधिलकीचे विश्वव्यापक नूतनीकरण करण्याच्या हेतूने श्री सत्यसाई बालविकास कार्यक्रमाची स्थापना केली.भगवान बाबा म्हणतात,” तुम्हाला शांत, स्थिर होण्यासाठी अभ्यास केला पाहिजे. तुमच्या हृदयातील दिव्य प्रेम दृढ आहे न हे तुम्ही पहिले पाहिजे केवळ तत्त्वावर आधारित ज्ञान अर्जित करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट नसून ते ज्ञान तुम्ही जीवनात आचरले पाहिजे.’पशुपक्षी अभ्यास न करताच जीवन जगतात.परंतु तुमच्या शिक्षणाची परिणती तुमच्या उत्तम आणि खंबीर चारित्र्यामध्ये झाली पाहिजे.”
अशा तऱ्हेने “शिक्षणाची परिणती चारित्र्यामध्ये होते” ह्या वचनावर आधारित श्री सत्यसाई बालविकासचा श्री गणेशा झाला आणि भगवान श्री सत्यसाई बाबांनी ह्याची स्थापना केली.
बालविकास म्हणजे मानवी उत्कृष्टतेचे विकसन. मानवी मूल्ये पाठ्य पुस्तकांद्वारे मनावर बिंबवली जाऊ शकत नाहीत किंवा ती कोणाकडून भेट म्हणूनही दिली जाऊ शकत नाहीत. ती जन्मतःच प्रत्येकामध्ये असतात. श्री सत्यसाई बालविकास कार्यक्रम त्या सुप्त मानवी मूल्यांचा विकास करण्यासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून देतो व सर्वोच्च परिपूर्णतेचा,प्रत्येक मुलास त्याच्यातील अंगभूत मूल्यांचा बोध करून होण्यासाठी पुष्टी देतो.
प्रत्येक मुलामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवणे केंद्रस्थानी असल्यामुळे आजची मुले व उद्याच्या समाजासाठी दीपस्तंभ बनणाऱ्या ह्या मुलांना आत्मशोध व आत्मज्ञान प्राप्ती होण्यास मार्गदर्शन करण्यासाठी,श्री सत्यसाई संघटनेच्या वैश्विक अभियानाचा एक भाग म्हणून बालविकास वर्ग चालवले जातात.
हा शब्द नको आहे, मुलांनी सत्य, धर्म, शांती, प्रेम आणि अहिंसा ह्या मूलभूत मानवी मूल्यांचा अभ्यासास साहाय्य करण्याचा दृष्टीने श्री सत्यसाई बालविकास कार्यक्रमाची रचना करण्यात आले आहे. प्रार्थना, सामूहिक गायन, ध्यान, कथाकथन, सांघिक उपक्रम ह्या सारख्या शिकवण्याच्या सोप्या तंत्राचा कुशलतेने वापर करून, बालविकास गुरु मुलांना त्यांच्यामध्ये असणाऱ्या नैसर्गिक क्षमतेची जाणीव होण्यासाठी प्रोत्साहित करतात स्पेस नाही जीवन मानवी उत्कृष्टतेकडे वळवतात. थोडक्यात, हे श्री सत्यसाई बालविकास कार्यक्रमाचे सार आहे.
स्वामींची सुवचने प्रास्ताविक संदेश खाली पारदर्शी करण्यासाठी, मराठीतील (शक्यतो बालविकासशी संबधीत) स्वामींची १० सुवचने आवश्यक आहेत.