स्तब्धतेतील थरार
उद्देश्य:
परस्परांमध्ये संवाद घडवून आणणारा हा उपक्रम आहे ज्यामुळे मुलांमध्ये जागरूकता आणि एकाग्रता या गुणांचे संवर्धन होते. मन स्तब्ध ठेवायचे असेल तर प्रथम शरीर स्तब्ध ठेवणे महत्वाचे आहे.
संबंधित मूल्ये:
- नवीन गोष्टींची सुरुवात
- स्वतःवर संयम
- शांतता
- स्थिरता
साहित्य:
संगीत
खेळ कसा खेळावा?
- गुरूंनी संगीत सुरु करावे आणि मुलांना गोल करून पळण्यास सांगावे
- संगीत थांबल्यावर गुरूंनी जोरात ‘कृष्ण’ असे म्हणावे. त्याच क्षणी सर्व मुलांनी कृष्णाप्रमाणे ‘पोझ’ घेऊन पुतळ्यासारखे स्तब्ध उभे राहावे.
- जे कोणी आपले शरीर थोडे सुद्धा हलवेल त्याला खेळातून बाद करावे.
- इतर उदाहरणे- हनुमान, राम, शिव, विठ्ठल, नरसिंह, जिझस, बुद्ध, मीराबाई. अशीही काही नावे गुरु सांगू शकतील.