शीर्षक – भव्य घोषणा
उद्दिष्ट:
मुलांची कल्पनाशक्ती जागृत करण्याचा एक नवीन उपक्रम
संबंधित मूल्ये
कल्पनाशक्ती
जिज्ञासू वृत्ती
प्रशंसा
साहित्य:
- एक भांडे
- जर मी फुल (पुष्प) असतो तर मला… आवडले असते अशा प्रकारची वाक्ये लिहून तयार केलेल्या चिठ्ठ्या (वाक्यांच्या संदर्भातील इतर उदा. रामायण, महाभारत, संत, थोर व्यक्तिमत्त्वे, वृक्ष, पूजेचे उपकरण, पंचतत्त्वे, पशु-पक्षी)
- संगीत/भजन
गुरुंसाठी पूर्वतयारी:
काही नाही
खेळ कसा खेळावा
- गुरूंनी मुलांना गोल करून बसण्यास सांगावे.
- मुलांना खेळ कसा खेळायचा ते गुरुंनी समजावून सांगावे.
- भजन वा संगीत सुरू करावे
- चिठ्ठ्या असलेले भांडे एका मुलाकडून दुसऱ्या मुलाकडे फिरवण्यास सांगावे.
- संगीत / भजन थांबल्यावर ज्या मुलांच्या हातात चिठ्यांचे भांडे असेल त्याने त्यातील एक चिठ्ठी उचलावी.
- उदा. 1 त्या चिठ्ठीवर जर ‘फुल’ हा शब्द लिहिलेला असेल तर तो मुलगा म्हणू शकतो, “जर मी फूल असतो तर मला कमळ व्हायला आवडले असते कारण ते आपले राष्ट्रीय पुष्प आहे”
- उदा. 2 चिठ्ठीवर जर पूजेचे उपकरण असे लिहिले असेल तर तू मुलगा म्हणू शकतो, “जर मी पूजेचे उपकरण असतो तर मला दीप व्हायला आवडले असते कारण तो त्याच्या आजूबाजूरला प्रकाशमान करतो.”
- अशाप्रकारे सर्व चिठ्ठ्या संपेपर्यंत आणि प्रत्येक मुलास त्याच्या कल्पनाशक्ती वाव देण्याची संधी मिळेपर्यंत हा खेळ सुरू ठेवावा.