बुद्ध जयंती
बुद्ध जयंतीस बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतात. बौद्धांचा हा सर्वात पवित्र सण मानला जातो. एप्रिल वा मे च्या दरम्यान येणाऱ्या ४थ्या चांद्रमासात म्हणजेच वैशाखात ही पौर्णिमा येते. हा दिवस बुद्धांच्या जीवनातील ३ महत्त्वाच्या घटनांचे स्मरण करून देतो.
- त्यांचा जन्म
- त्यांना झालेले आत्मज्ञान
- त्यांचे निर्वाण वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी देहत्याग केला.
भगवान बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते आणि ते विष्णूंचा नववा अवतार आहेत असे म्हणतात. बुद्धांचे खरे नाव सिद्धार्थ गौतम होते. इ.स. पूर्व ५४३ मध्ये, नेपाळ मधील कपिलवस्तु येथे त्यांचा जन्म झाला.
बुद्धांचा जन्म आणि जन्मथान
सिद्धार्थ, राजा शुद्धोधन आणि राणी मायादेवी ह्यांचा पुत्र होता. नेपाळच्या रूपानदेही जिल्ह्यातील, लुम्बिनी नावाच्या नितांत सुंदर आणि शांत क्षेत्रा मधील साल वृक्षांच्या बगीचामध्ये बुद्धांचा जन्म झाला.
नेपाळमधील गौतम बुद्धांचे लुम्बिनी हे जन्मस्थान, युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.
- बुद्ध म्हणजे. “आत्मज्ञानी.” गौतम बुद्ध, शाक्यमुनी ह्या नावानेही ओळखले जातात.
- असे मानले जाते की सिद्धार्थने जन्म झाल्या झाल्या उत्तरेकडे सात पावले टाकली आणि हाताचे बोट उंचावून, तो ह्या जगातील परमपुरुष असल्याचे आणि तो त्याचा अंतिम जन्म असल्याचे त्याने सूचित केले.
- बुद्ध ८० वर्षाचे असताना, त्यांनी त्यांचा मित्र आणि चुलत बंधू आनंद ह्याला ते लवकरच जग सोडून जाणार असल्याचे सांगितले. ते कुशीनगरमध्ये होते, ती पौर्णिमेची रात्र होती. त्यांनी आंबलेले अन्न खाल्ले आणि ते आजारी पडले. साल वृक्षाच्या खाली ते गहन ध्यानामध्ये गेले आणि त्यांचे निर्वाण झाले. त्यांचे शेवटचे शब्द होते…….
- सर्व निर्मिती अशाश्वत आहे ह्याची जाणीव ठेवून प्रयत्नांची पराकाष्ठा करा.