श्री सत्यसाई बालविकास कार्यक्रम वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण ह्यामध्ये मूल्यांचे अनुभवजन्य शिक्षण दिले जाते. हा वर्ग नव्हे आणि गुरु म्हणजे शिक्षक नव्हेत. मुलांच्या सर्वांगीण विकासास केंद्रस्थानी ठेवून, वेगवेगळी साधने, तंत्र वापरुन, गुरु अत्यंत प्रेमाने मुलांचे सुंदर व्यक्तिमत्त्व घडवतात.
अशा प्रकारची गोष्ट म्हणजे अनुभवजन्य शिक्षण होय. कथाकथन, ध्यान आणि भजन शिकणे ह्या गोष्टी मुलांमध्ये मूल्ये आणि आध्यात्मिकता विकसित करण्यास सहाय्य करतात. तसेच अनुभवजन्य शिक्षण मुलांना सुजाण नागरिक बनण्यास आणि सामाजिक बांधिलकी जपण्यास सहाय्य करते.
उदाहरणार्थ, मुलांना वृक्ष रोपण आणि संवर्धन करण्यास प्रोत्साहित करा. त्यावरून त्यांची चिकाटी आणि नवजीवन पोषित करण्याची क्षमता दिसून येते. अन्न वाया घालवू नये तसेच बनवलेले पदार्थ सर्वांनी वाटून खावेत हे धडे देण्यासाठी, साधन म्हणून असे पदार्थ बनवायला शिकवावेत, ज्यासाठी गॅसचा वापर करावा लागत नाही. टाकाऊतून टिकाऊ ह्या वर्गांमधून संवर्धन आणि पंचतत्त्वांचे महत्त्व ठळकपणे दिसून येते.

















![अष्टोत्तरा [ ५५ – १०८] श्लोका](https://sssbalvikas-s3.s3.ap-south-1.amazonaws.com/wp-content/uploads/2021/04/ashtothram-tiles.png)

