विषाची बीजे
दशरथ अयोध्येला आपली मुले व सुना यांच्यासह परतला. अयोध्येत सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. चारही भाऊ – विशेषतः राम सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र होता आणि तो अयोध्यावासी जनांना अत्यंत प्रिय बनला. दशरथाचा तो अत्यंत प्रिय काळ होता. अशा प्रकारे काही दिवस गेले.
नंतर त्याने भविष्याचा विचार केला. वयोवृद्ध होत असताना त्याला असे वाटले की आपण अधिक जगू शकणार नाही. त्यामुळे त्याला असे वाटले की रामाला राजसिंहासनावर बसविण्याची हीच योग्य वेळ आहे. त्याने इक्ष्वाकू कुलाचे गुरु वसिष्ठांना बोलावले व त्यांचा सल्ला घेतला. गुरु वसिष्ठांनी राजाच्या कल्पनेला दुजोरा दिल आणि त्यांनी दुसराच दिवस रामाच्या राज्याभिषेकाचा मंगलदिन म्हणून पक्का केला. दशरथा अन्य व्यवस्था करण्याचे आदेश दिले. ही बातमी ऐकल्यावर प्रजेला अपार आनंद झाला. ते उत्सुकतने दुसरा दिवस उजाडण्याची वाट पाहू लागले.
परंतु, कैकेयीची वैयक्तिक दासी मंथरेने वेगळा विचार केला. ती कैकेथीला भेटली आणि तिने तिचे मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला. समाबद्दल अतिशय प्रेम असणाऱ्या कैकेयीने मंथरेच्या म्हणण्याकडे कानाडोळा केला. परंतु हळूहळू तिच्या दासीच्या कावेबाज बोलण्याला ती बळी पडली.
मंधरेने दशरथाच्या भेटीचे योग्य प्रयोजन निर्माण केले. दशरथ आपल्या प्रिय पत्नीला-कैकेयीला बातमी सांगण्यास आला. कैकेयीने त्याचे स्वागतही केले नाही. त्याच्या लक्षात आले की कोणीही नेहमीप्रमाणे आपले स्वागत करीत नाही. त्याने कैकेयीची चौकशी केली. कोणीही उत्तर दिले नाही. त्याने तिला बाजूच्या खोलीत एका कोपऱ्यात झोपल्याचे पाहिले. त्याला वाटले की तिला कसलातरी त्रास होत असावा, म्हणून त्याने तिची विचारपूस केली. परंतु ती तेथून निघून गेली.
शेवटी बऱ्याचदा मन वळविल्यानंतर तिने स्पष्ट शब्दात सर्व सांगितले. “प्रिय, तुम्हाला आठवते, तुम्ही मला दोन वर दिले होते. ते मी सुरक्षित ठेवले होते. आवश्यकता वाटल्यावर मागेन असे सांगितले होते. आता वर देण्याची ती वेळ आली आहे. “दशरथाने उत्तर दिले “प्रिये, याकरिता का तू काळजीत होतीस? तुझ्या केवळ विचारण्याने मी ते वर तुला देत आहे.”
कैकेयी म्हणाली, “मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या वचनाचे पालन कराल. कृपया ऐका. पहिल्या वराने माझा मुलगा भरत याला अयोध्येचा राजा करावे. दुसऱ्या वराने रामाला चौदा वर्षे वनवासात पाठविण्यात यावे.’
दशरथाचा आपल्या कानांवर विश्वास बसला नाही. तीव्र धक्क्यामुळे त्याला बोलता येईना. त्याने विनवणी केली, “रामाने तुला काय केले आहे? मला माहीत आहे की त्याने कधी मुंगीचेही अहित केले नाही. माझ्या प्रिय रामाशिवाय मी जगू शकणार नाही, हे तुला माहीत नाही का? म्हणून प्रिये, कठोरपणा कमी कर हो. हा वर मागे घे आणि दुसरे काहीही माग. ते मी तुला ताबडतोब देतो.” परंतु कैकेयी अडून राहिली. तिने आपल्या मागण्यांचा हट्ट धरला.
दशरथाची मोठी बिकट अवस्था झाली. एवढेच नव्हे तर त्याने वाकून कैकयीचे पाय धरले आणि तिची विनवणी केली. परंतु कैकेयी खडकाप्रमाणे दृढ राहिली. तिने जाहीर केले, “जर रामाला राज्याभिषेक झाला तर मी विष घेईन आणि मरेन.” दशरथाच्या मनःस्थितीची कल्पना आपण करु शकतो. त्याला रामाबद्दलचे प्रेम आणि धर्माबद्दलचे प्रेम यातून निवड करावयाची होती. शेवटी सत्याबद्दलची त्याची आवड विजयी ठरली. तो म्हणाला, “बरे आहे. जशी तुझी इच्छा आहे तसे कर. माझ्या ओठांवर रामाचे नाव असताना मी प्राण सोडीन.” असे म्हणत दशरथ मूर्च्छित होऊन कैकेयीच्या पायाशी पडला.
पहाट जवळ येत होती. अयोध्येचे नागरिक अत्यंत आतुरतेने राज्याभिषेकसमयी वाजणाऱ्या तुताऱ्या आणि इतर वाद्यांच्या घोषाची वाट पाहात होते. परंतु कोणताही आवाज ऐकू आला नाही.
कैकेयीच्या महालात रामाला बोलावण्यात आले. तेथे आपले वडील अचेतन स्थितीत असलेले रामाने पाहिले. राम क्षुब्ध झाला आणि त्याने आपल्या सावत्र आईकडे विचारणा केली. तिने त्याला शांतपणे सांगितले, त्यांचा सल्ला घेतला. गुरु वसिष्ठांनी राजाच्या कल्पनेला दुजोरा दिला आणि त्यांनी दुसराच दिवस रामाच्या राज्याभिषेकाचा मंगलदिन पक्का केला. दशरथाने अन्य व्यवस्था करण्याचे आदेश दिले. ऐकल्यावर प्रजेला अपार आनंद झाला. ते उत्सुकतेने दुसरा दिवस ही उजाडण्याची वाट पाहू लागले.
परंतु, कैकेयीची वैयक्तिक दासी मंथरेने वेगळा विचार केला. ती कैकेयीला भेटली आणि तिने तिचे मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला. रामाबद्दल अतिशय प्रेम असणाऱ्या कैकेयीने मंथरेच्या म्हणण्याकडे कानाडोळा केला. परंतु हळूहळू तिच्या दासीच्या कावेबाज बोलण्याला ती बळी पडली.
मंधरेने दशरथाच्या भेटीचे योग्य प्रयोजन निर्माण केले. दशरथ आपल्या प्रिय पत्नीला – कैकेयीला बातमी सांगण्यास आला. कैकेयीने त्याचे स्वागतही केले नाही. त्याच्या लक्षात आले की कोणीही नेहमीप्रमाणे आपले स्वागत करीत नाही. त्याने कैकेयीची चौकशी केली. कोणीही उत्तर दिले नाही. त्याने तिला बाजूच्या खोलीत एका कोपऱ्यात झोपल्याचे पाहिले. त्याला वाटले की तिला कसलातरी त्रास होत असावा, म्हणून त्याने तिची विचारपूस केली. परंतु ती तेथून निघून गेली.
शेवटी बऱ्याचदा मन वळविल्यानंतर तिने स्पष्ट शब्दात सर्व सांगितले. “प्रिय, तुम्हाला आठवते, तुम्ही मला दोन वर दिले होते. ते मी सुरक्षित ठेवले होते. आवश्यकता वाटल्यावर मागेन असे सांगितले होते. आता वर देण्याची ती वेळ आली आहे. “दशरथाने उत्तर दिले – “प्रिये, याकरिता का तू काळजीत होतीस? तुझ्या केवळ विचारण्याने मी ते वर तुला देत आहे.”
कैकेयी म्हणाली, “मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या वचनाचे पालन कराल. कृपया ऐका. पहिल्या वराने माझा मुलगा भरत याला अयोध्येचा राजा करावे. दुसऱ्या वराने रामाला चौदा वर्षे वनवासात अयोध्येचा राजा करावे. दुसऱ्या वराने रामाला चौदा वर्षे वनवासात पाठविण्यात यावे.”
दशरथाचा आपल्या कानांवर विश्वास बसला नाही.तीव्र धक्क्यामुळे त्याला बोलता येईना. त्याने विनवणी केली, “रामाने तुला काय केले आहे? मला माहीत आहे की त्याने कधी मुंगीचेही अहित केले नाही. माझ्या प्रिय रामाशिवाय मी जगू शकणार नाही, तुला माहीत नाही हे तुला माहीत नाही का? म्हणून प्रिये, कठोरपणा कमी कर हो. हा वर मागे घे आणि दुसरे काहीही माग. ते मी तुला ताबडतोब देतो.” परंतु कैकेयी अडून राहिली. तिने आपल्या मागण्यांचा हट्ट धरला.
दशरथाची मोठी बिकट अवस्था झाली. एवढेच नव्हे तर त्याने वाकून कैकयीचे पाय धरले आणि तिची विनवणी केली. परंतु कैकेयी खडकाप्रमाणे दृढ राहिली. तिने जाहीर केले, “जर रामाला राज्याभिषेक झाला तर मी विष घेईन आणि मरेन.” दशरथाच्या मनःस्थितीची कल्पना आपण करु शकतो. त्याला रामाबद्दलचे प्रेम आणि धर्माबद्दलचे प्रेम यातून निवड करावयाची होती. शेवटी सत्याबद्दलची त्याची आवड विजयी ठरली. तो म्हणाला, “बरे आहे. जशी तुझी इच्छा आहे तसे कर. माझ्या ओठांवर रामाचे नाव असताना मी प्राण सोडीन.” असे म्हणत दशरथ मूर्च्छित होऊन कैकेयीच्या पायाशी पडला.
पहाट जवळ येत होती. अयोध्येचे नागरिक अत्यंत आतुरतेने राज्याभिषेकसमयी वाजणाऱ्या तुताऱ्या आणि इतर वाद्यांच्या घोषाची वाट पाहात होते. परंतु कोणताही आवाज ऐकू आला नाही.
कैकेयीच्या महालात रामाला बोलावण्यात आले. तेथे आपले वडील अचेतन स्थितीत असलेले रामाने पाहिले. राम क्षुब्ध झाला आणि त्याने आपल्या सावत्र आईकडे विचारणा केली. तिने त्याला शांतपणे सांगितले, “प्रिय मुला , तूच एकटा तुझ्या वडिलांची व्यथा दूर करु शकशील.” राम म्हणाला, “आई, वडिलांना आनंद देण्यासा मी कोणतीही गोष्ट करीन. मला आज्ञा दे.”
दशरथाने पूर्ण करण्याचे वचन दिलेल्या दोन वरांबद्दल कैकेयीने पुन्हा सांगितले.
“रामाने अतिशय शांतपणे सर्व ऐकले आणि तो म्हणाला, “वडिलांची इच्छा पूर्ण केली जाईल. त्याचे कोणतेही परिणाम होवोत. नंतर त्याने वडिलांच्या व कैकेयीच्या चरणांना स्पर्श केला आणि तो निघून गेला. तो सरळ आपल्या आईच्या – कौसल्येच्या महालात गेला. तेथे सुमित्रा, सीता, लक्ष्मण आणि शत्रुघ्न एकत्र जमले होते. त्याने शांतपणे त्यांना ही बातमी सांगितली आणि सांगितले की त्याच्या वनात जाण्याने कोणीही अनावश्यक काळजी करु नये.
ताबडतोब कौसल्येला मूर्च्छा आली. राम तिच्या पायाशी बसला आणि हळूहळू त्याने तिला सावध केले.
नंतर अनेक कटू शब्दांची देवाणघेवाण झाल्यावर असे ठरले की रामा बरोबर सीता व लक्ष्मण वनात जातील. प्रत्येकाने कैकेयीला दोष दिला. परंतु रामाने विनंती केली की तिला (कैकेयीला) दोष देऊ नये. त्याने सांगितले की तो अत्यंत आनंदाने वडिलांची इच्छा पूर्ण करीत आहे, बाकी काही नाही.
शेवटी दशरथ तेथे आले आणि त्यांनी आज्ञा केली की संपूर्ण अयोध्येने रामाबरोबर जंगलात जावे आणि रामाला सर्व राजायोग्य सुखसोयी तेथे उपलब्ध करुन दिल्या जाव्यात. परंतु राम म्हणाला, ‘भरताला ओसाड राजवाड्यात रिकाम्या नगरीवर राज्य करायला सांगू नये.’
राम, लक्ष्मण आणि सीतेने वल्कले धारण केली, राजा दशरथाच्या आज्ञेप्रमाणे मंत्री सुमंताने तिघांना रथात बसविले आणि प्रचंड कोलाहलात रथाने अयोध्या सोडली.
आपल्या लाडक्या पुत्राला – रामाला बनवासात पाठविल्याबद्धल कौसल्येने दशरथाला दोष दिला. यावेळी दशरथाला त्याच्या तारुण्यातील प्रसंगाची आठवण झाली. नंतर त्याने कौसल्येला त्याचे वर्णन ऐकविले आणि श्रवणकुमाराची गोष्ट सांगितली. आणि आपण भूतकाळात अनावधानेने केलेल्या कार्याचे हे फळ आहे असे त्याने मान्य केले.
एका उन्हाळ्यातील रात्री तो जंगलात शिकारीसाठी गेला होता. तो धनुर्विद्येत अतिशय प्रवीण होता आणि प्रत्यक्ष न पाहाता केवळ आवाजाच्या दिशेने तो शब्दवेध घेऊ शकत होता. अचानक त्याला आपल्या सोंडेने हत्ती पाणी पीत असल्याचा आवाज ऐकू आला आणि ताबडतोब त्याने त्या दिशेने बाण सॉडला. तत्क्षणी त्याने आक्रोश करणारा माणसाचा आवाज ऐकला, “तात! आई ग! मी आता मरतो.”
दशरथाला धक्काच बसला. तो त्या ठिकाणी पळत आला आणि त्याने पाहिले की एक तरुण तपस्वी तळ्यानजीक दुःखाने ओरडत आहे. तो म्हणाला, “तुम्ही मला का मारलेत? मी अत्यंत निरागसपणे आईवडिलांसाठी पाणी काढीत होतो. माझे आईवडील तेथे झोपले आहेत. ते माझा वियोग सहन करु शकणार नाहीत. मी आता जगू शकणार नाही. मी आता मरत आहे. तुम्ही जा आणि माझ्या आईवडिलांना पाणी द्या आणि त्यांच्या पाया पडा.”
दशरथ ताबडतोब पाण्याचा कमंडलू घेऊन त्या म्हाताऱ्या जोडप्याकडे गेला आणि त्याने त्यांच्या पायावर डोके ठेवले. त्याने त्यांना सांगितले, “मी तुमचा मुलगा नाही. मी तुमच्या मुलाला मारुन फार मोठे पाप केले आहे. कृपया मला क्षमा करावी.”
हे शब्द ऐकल्यावर वृद्ध जोडपे सुन्न झाले. “तुझ्या हातून अजाणतेपणाने फार मोठे पाप घडले आहे. तुलाही भविष्यकाळात कधीतरी तुझ्या प्रिय पुत्राचा वियोग सहन करावा लागेल.”
मुंज झाल्य करण्याची परवानगी करीत असताना रघु जगाचे त्याला भान परमेश्वराचे दर्शन दशरथाने हे सर्व कौसल्येला वर्णन करुन सांगितले आणि तो म्हणाला, “मी केवळ माझ्या स्वत:च्या कर्माची फळे भोगीत आहे.’