गुरुचरणांबुजनिर्भर भक्तः
ऑडिओ
श्लोकाचे बोल
- गुरुचरणांबुजनिर्भर भक्तः
- संसारादचिराद्भव मुक्तः
- सेन्द्रियमानसनियमादेवं
- द्रक्ष्यसि निजहृदयस्थं देवम्
अर्थ
मन आणि इंद्रियांचा निग्रह करुन स्वतःला गुरुंच्या चरण कमलांवर शरणागत करा आणि संसाराच्या बेड्यांपासून मुक्त व्हा. आपल्या हृदयामध्ये विराजमान असलेल्या परमेश्वराचे दर्शन घ्या.
“हे मूढमती! गोविंदाला प्राप्त करा आणि मुक्तीमती बना.”
अशा तऱ्हेने शंकराचार्यांनी भज गोविन्दंमधील शिकवणीची सांगता केली आहे. आणि आज पुन्हा तीच शिकवण भगवान श्री सत्यसाई बाबा आपल्याला शिकवत आहेत.
स्पष्टीकरण
गुरुचरणांबुज | गुरुंचे चरण कमल |
---|---|
निर्भर | आश्रित, आश्रय घेणारे |
भक्त | भक्त |
संसाराद् | संसारातून |
अचिराद्भव | जन्म मृत्युच्या चक्रातून क्षणार्धात (तात्काळ) |
मुक्त | मुक्त |
सेन्द्रियमानस | स + इंद्रिय + मानस – इंद्रिय आणि मनासह |
नियमादेव | केवळ नियंत्रण |
द्रक्ष्यसि | तुम्ही पाहाल, दर्शन घ्याल |
निज | आत्म, स्वतःचे |
हृदयस्थं | हृदयात स्थित असलेले |
देवम् | परमेश्वर |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 0
The curriculum is empty