कपड्यावरचा मळ काढून स्वच्छ करण्यासाठी आपण साबण आणि पाणी वापरतो. त्याचप्रमाणे आपल्या मनावरील अनावश्यक इच्छांची मलिनता दूर करून मन निर्मळ बनवण्यासाठी जपरूपी साबण व ध्यान रुपी पाणी वापरता येते.
आपल्या मनाला माशीसारखे स्वैरपणे दाही दिशांना भटकू देऊ नये. माशी मिठाईच्या दुकानातही फिरत राहते, कचऱ्याच्या गाडी मागेही धावते. माशीचे जे असे मन आहे त्या मनाला मिठाईच्या दुकानातील माधुर्य आणि कचऱ्याच्या गाडीतील अशुद्धता समजून घेण्यास शिकवले पाहिजे म्हणजे ती मिठाईचे दुकान सोडून कचऱ्याच्या गाडी मागे धावणार नाही, अशी शिकवण दिली जाते त्याला ध्यान म्हणतात. ध्यानामुळे एकाग्रता आणि सर्व कार्यात यश लाभते.
गट १ च्या मुलांसाठी जप आणि ध्यानाची तंत्र सुचवण्यात आली आहेत. ज्यामध्ये मोठ्या आवाजात नामस्मरण करणे. जपमाळ घेऊन नामस्मरण करणे व लिखित जप करणे हया गोष्टी अंतर्भूत आहेत.
हया भागामध्ये जप आणि ध्यान ह्यांचा आढावा घेतला आहे आणि ‘मोठ्या आवाजात नामस्मरण करणे’ ह्या पहिल्या तंत्राविषयी तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे.