“प्रेमधर्म हा एकच धर्म आहे.
हृदयाची भाषा, ही एकच भाषा आहे
मानवजात ही एकच जात आहे
परमेश्वर एकच आहे, तो सर्वव्यापी आहे.”
भगवान बाबा म्हणतात, “सर्व धर्मांनी त्यांच्या मूळ शिकवणीमध्ये त्याच एका सत्यावर भर दिला आहे,” परंतु फार थोडे लोक धर्माचे अंतर्गत महत्व समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
प्रत्येक धर्माचे अनुयायी त्याच एका परमेश्वराची आराधना करतात, जो सर्वव्यापी आहे आणि जो त्यांच्या प्रार्थना ऐकतो, ते कोणत्याही कुळाचे असोत, कोणतीही भाषा बोलत असोत, परंतु तोच परमेश्वर संपूर्ण मानवजातीला आनंद प्रदान करतो. कोणत्याही धर्माचा वेगळा देव नाही जो केवळ त्या धर्मावर विश्वास असणाऱ्यांवरच कृपेचा वर्षाव करेल