दुर्गा देवीचे प्रत्येक रुप शक्तिशी संबंधित आहे. ही शक्तिची देवता आहे. मानवामध्ये अमर्याद शक्ती आहे जी दिव्य आहे आणि आकलनाच्या पलिकडची आहे. सर्वांमध्ये वाग्देवीच्या रूपात सरस्वती विद्यमान आहे. देहास ब्रह्म आणि जिव्हेस सरस्वती मानले जाते. हृदयामधून निर्माण होणारी स्पंदने, देह आणि जिव्हा ह्यांच्या संयोगद्वारे ध्वनिमधून अभिव्यक्त होतात. ‘लक्ष्मी’ संपदा आणि समृध्दीचे प्रतिक आहे. लक्ष्मी ना केवळ धनाचे प्रतिक आहे तर सुख आणि आनंदाची संपत्तीचेही प्रतिक आहे. महिषासुर दैत्य हे दुष्प्रवृत्तीचे प्रतिक आहे. दुर्गा,लक्ष्मी, सरस्वती अनुक्रमे इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती ह्यांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या संयुक्त शक्तीने त्या महिषासुराचा वध करतात. —- बाबा
ही देवी भजने गाऊन, आपण साईमातेची प्रार्थना करु या. तिने आपल्यामध्ये असणाऱ्या ह्या सर्व शक्ती जागृत कराव्यात. म्हणजे इच्छा शक्ती, क्रिया शक्ती आणि ज्ञान शक्ती ह्या तिन्ही शक्तींच्या सहाय्याने, आपण आपल्या आध्यात्मिक प्रवासातील सर्व अडथळ्यांवर मात करु शकु.