जुळणी करण्याचे खेळ
मुलांनी जुळणी करण्याच्या खेळांसाठी शब्दांच्या जोड्याचे, चित्रांचे अथवा वस्तूंचे समूह घेऊन त्यांच्या समान घटकांच्या जोड्या लावाव्यात. मुले दोन वस्तु एकत्र करुन विशिष्ट आकृती बनवतो.
जुळणी खेळांमुळे सर्वसाधारण बौद्धिक क्षमता वृद्धींगत होते आणि स्वतंत्र अभ्यासाच्या सरावास प्रोत्साहन मिळते. त्यामुळे मुलांना समान आणि भिन्न ही संकल्पना समजण्यास मदत होते. त्यामुळे त्यांच्या निर्णायक विचार करण्याच्या वृत्तीचे बालवयातच संगोपन होते. या खेळांमधे बालकास त्याचे किंवा तिचे निर्णय आणि कारण मिमांसा क्षमता पूर्णपणे वापरावी लागते. वस्तूंची जुळणी करताना ते का एकत्र येतात यासाठी आकलन कौशल्य आणि क्षमता महत्त्वाची असते. वस्तू एकमेकांमध्ये जोडताना मुलांना दृश्य भेदाभेदाचा सराव होतो आणि वस्तु जोडण्यात कुशलता प्राप्त होते. जुळणी खेळांमधे मुलांचे बारीक लक्ष असणे आवश्यक असते. त्यामुळे त्यांची एकाग्रता वाढते. त्यामुळे त्यांचे स्वतःविषयी चांगले मत होते आणि आत्मविश्वास वाढतो.
बालविकास गुरु विविध उपक्रमांद्वारे, वस्तू, चित्रे, शब्द, आवाज, रंग, सावल्या, नमुने,आकृत्या आणि अंक यांची निवड करुन जोडणी करण्यात मुलांना प्रोत्साहन देऊ शकतात. या मजेदार दृष्टिकोनाद्वारे मुलांचे शिक्षण मनोरंजक होईल.
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 3
-
ABOUT GROUP ACTIVITIES
-
SAMPLE GAMES