प्रभू रामचंद्रांची कथा ही आजही सत्याचा शोध घेणाऱ्यांसाठी अत्यंत समर्पक व सुसंबद्ध आहे. कर्तव्य, सत्य, भक्ती, श्रद्धा, सदाचरण व त्याग ह्यासारख्या पवित्र आदर्शांचे रामायण हे प्रतीक आहे. ह्या महाकाव्यातून पालकांच्या आज्ञेचे पालन, नियमांचे पालन व सदाचरण ह्यासारखे उच्च व्यक्तिगत आदर्श निर्दिष्ट केले जातात. मनुष्याने निरंतर त्याच्या धर्माचे (कर्तव्यांचे) पालन केले पाहिजे हे ह्या सर्व शिकवणींचे सार आहे. आपण आपल्या जीवनामध्ये ही मूल्ये अंतर्भूत करून आनंद मिळवला पाहिजे.
स्वामी म्हणतात, “रामायण म्हणजे मनुष्याने आदर्श जीवन कसे जगावे हे दर्शवण्यासाठी परमेश्वराकडून मनुष्याला दाखवलेला सुमार्ग आहे.” ह्या कलियुगामध्ये मोक्षमार्गावर घेऊन जाणाऱ्या रामनामाच्या महत्त्वावर स्वामींनी विशेष जोर दिला. (दिव्य संदेश रामनवमी, 30 मार्च 2004)
पहिल्या गटाला रामायणाचा एक कथा म्हणून परिचय करून देऊ शकता. सत्य, आज्ञाधारकता आणि पालकांविषयी आदर यासारखे हलकेफुलके धडे केंद्रस्थानी ठेवा. स्वामींचे ‘रामकथा रसवाहिनी’ हे पुस्तक म्हणजे रामायणातील काही अज्ञात तथ्यांच्या तपशीलाचा संग्रह होय.