प्रत्येकामध्ये सत्याचे स्फुल्लिंग आहे. त्या स्फुल्लिंगाशिवाय कोणीही जगू शकत नाही. ती ज्योत म्हणजेच परमेश्वर. कारण तोच सत्याचा स्तोत्र आहे. ज्या मनुष्याला वास्तव जाणून घ्यायचे असते तो निरंतर सत्याचा शोध घेतो.
स्थल, काल वा गुण ह्यानुसार सत्य बदलत नाही. ते सदैव आहे तसेच असते त्यामध्ये कोणताही बदल होत नाही. सत्य अबाधित आहे, अविकारी आहे. कोणत्याही बाह्य घटकांद्वारे ते कधीही मिथ्या असल्याचे सिद्ध होत नाही. आपल्या बोलण्यामधून अप्रिय सत्य व प्रिय असत्य हे दोन्ही टाळले पाहिजे.
ह्या विभागात सूचीबद्ध केलेली ‘सत्य हाच परमेश्वर’ ही कथा विद्यार्थ्यांना, वर्गातील एका साध्या प्रसंगातून, ‘सत्याचे आचरण मनुष्याला कसे चांगले आणि महान बनवते’ हा धडा शिकवते.