“ज्याप्रमाणे हत्ती जंगलामधून फिरत असताना, इतरांना जाण्यासाठी वाट मोकळी करुन ठेवतो त्याचप्रमाणे गणेशाला आवाहन केल्याने, आपण हाती घेतलेल्या सर्व कार्यांचा मार्ग मोकळा होतो. हत्तीचा पाय एवढा मोठा असतो की तो चालताना इतर कोणत्याही प्राण्याचे ठसे पुसून टाकू शकतो. ह्याचाही गर्भितार्थ असा आहे की जेव्हा गणेशाला मानाचे स्थान दिले जाते तेव्हा मार्गातील सर्व अडथळे दूर होतात आणि गणेशाच्या कृपेने जीवनयात्रा सुलभ आणि आनंदी बनते.”— बाबा
मनुष्याच्या जीवनातील सर्व अडथळे आणि त्रास गजाननाच्या कृपेने दूर होतो. आपण ही गणेशाची भजने गाऊया आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करु या.
ही गणेशाची भजने गाऊन आपण गणेशाची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करु या.