कृष्णाची तुला करताना, सत्यभामेने तिची सर्व आभूषणे एका पारड्यात टाकली तरीही दोन्ही पारडी समतोल होत नव्हती. त्यानंतर रुक्मिणी आली आणि तिने असे घोषित केले की केवळ कृष्णाच्या नामोच्चारणाने दोन्ही पारडी समतोल होतील. त्याचबरोबर पत्र पुष्प वा जल अर्पण केल्यास तराजूचा काटा कृष्णाच्या विरुद्ध दिशेला झुकेल. असे म्हणत तिने दुसऱ्या पारड्यामध्ये तुळशीचे एक पान ठेवले. आणि काय आश्चर्य! ते पारडे खाली गेले. त्या तुळशी पत्राने, रुक्मिणीच्या असीम कृष्णप्रेमाचे वजन धारण केले होते. सत्यभामेची सर्व आभूषणे व्यर्थ ठरली तथापि रुक्मिणीने कृष्ण नाम उच्चारून केलेल्या आवाहनाने आणि प्रेमभरीत हृदयाने अर्पण केलेल्या तुळशी पत्राने तराजूचा काटा कृष्णाच्या विरुद्ध दिशेला झुकला. धनसंपदा, विद्वत्ता, सत्ता वा पद अशा कोणत्याही गोष्टीने परमेश्वर प्रभावित होत नाही. केवळ प्रेमानेच त्याला वश करता येते. – बाबा
मानवतेला, त्याच्या माधुर्यानी, त्याच्या लीलानी व गीतांनी मोहित करण्यासाठी तसेच मनुष्याला प्रेम मार्ग व दिव्य प्रेमात जीवन कसे जगावे हे दर्शविण्यासाठी परमेश्वराने कृष्णावतार घेतला. कृष्णाचे आगमन, अंधकाराचा, दुःखाचा व अज्ञानाचा नाश आणि मनुष्याला परमज्ञान ह्या गोष्टी सूचित करते. चला आपण सर्वजण मिळून कृष्णाचा महिमा गाऊया!