साईबाबा नावाच्या अर्थाचा विचार करताना, सा म्हणजे दिव्य आई म्हणजेच माता आणि बाबा म्हणजे पिता.जसा सांबशिवा याचा अर्थ दिव्य माता आणि पिता असा होतो तसेच हे नामही दिव्य माता आणि पिता असे सुचित करते. तुम्हाला जन्म देणाऱ्या माता-पित्याच्या प्रेमात थोडासा स्वार्थाचा अंश असतो परंतु हे साई माता आणि पिता, आपल्याला केवळ आत्मसाक्षात्काराच्या लढ्यामध्ये यश मिळावे ह्यासाठी आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करतात आणि त्याचबरोबर आपल्या चुका दाखवून देऊन आपली कानउघाडणीही करतात. पुढील परमकार्य सिद्ध नेण्यासाठी साई आले आहेत. बंधुत्वभावा द्वारे संपूर्ण मानवते मध्ये एका कुटुंबाप्रमाणे ऐक्य भाव निर्माण करणे. समस्त विश्वाचा आधार असलेल्या दिव्यत्वाचे प्रकटीकरण करण्यासाठी प्रत्येक जीवामधील आत्मिक सत्यतेस प्रकाशमान करणे आणि त्या सत्यतेचे पुष्टीकरण करणे. पशुवृत्तीचा त्याग करून दिव्यत्वा पर्यंत पोहोचण्याचे मनुष्याचे जे ध्येय आहे ते प्राप्त करण्यासाठी, मनुष्याला मनुष्याशी बांधणारा सामायिक दिव्य वारसा त्याने ओळखावा हे सांगण्यासाठी साई आले आहेत. मी प्रेम स्वरूप आहे; प्रेम माझे साधन आहे. असा कोणताही जीव नाही की ज्याच्याकडे प्रेम नाही, किमान निम्न पातळीवरील प्रेम त्याच्याकडे आहे आणि त्याचा आत्मा म्हणजेच परमेश्वर होय. ज्याप्रमाणे मलेरियाच्या रुग्णांना गोड आवडत नाही किंवा मधुमेहाच्या रुग्णांना गोड वर्ज असते त्याप्रमाणे जरी काही जणांना ते आवडत नाहीत वा काही जण त्यांना नाकारतात तरी तेथे कोणीही नास्तिक नसतात. जे लोक आपण नास्तिक असल्याची प्रौढी मिरवतात, एक दिवस जेव्हा त्यांचा आजार नाहीसा होतो तेव्हा ते परमेश्वराची गोडी चाखतात आणि त्याला पूज्य मानतात. माझा सत्याविषयी तुम्हाला बरंच काही मला सांगावे लागले कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्याच्यावर चिंतन करावे आणि त्यातून प्राप्त होणारा आनंद लुटावा. मी घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी तुम्ही प्रेरित व्हावे व आत्मसाक्षात्कार, तुमचा हृदयात तळपणाऱ्या साईंचा साक्षात्कार या ध्येयाच्या दिशेने तुम्ही प्रगती करावी.- बाबा
आपण आपल्या दिव्य पालकांचा महिमा वर्णन करणारी स्वामींची भजने गाऊ