heading-logo
श्री सत्य साई कार्यक्रमाचे आढावा

श्री सत्यसाई बालविकास म्हणजे “मानवी उत्कृष्टतेचे विकसन”. मुलांच्या अध्यात्मिक गरजांच्या पूर्तीसाठी, मुलांच्या चारित्र्याची जडणगडन करण्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी तसेच मुलांना भारताच्या समृद्ध संस्कृतीचा व मानव जातीचे ऐक्य जाणणाऱ्या आध्यात्मिकवर्षाचा परिचय करून देण्यासाठी, भगवान श्री सत्यसाई बाबांनी, मुलांच्या पालकांना घातलेल्या सादेस प्रतिसाद म्हणून भारतामध्ये बालविकास सुरु झाला.

भगवान श्री सत्य साई बाबांनी, सक्रिय नैतिक जीवनासाठी, व्यक्तिगत बांधिलकीचे विश्वव्यापक नूतनीकरण करण्याच्या हेतूने श्री सत्यसाई बालविकास कार्यक्रमाची स्थापना केली. अंतिम ध्येय डोळ्यापुढे ठेवून, प्रत्येक बालविकास वर्गासाठी आठवड्यातून एक तासाचे वेळपत्रक बनवण्यात अली व शिकवण्याच्या काही सध्या, सोप्या परंतु प्रभावी तंत्राचा अंगीकार केला म्हणजे.

अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य

५ ते १३ वयोगटातील मुलांसाठी ३ टप्प्यांमध्ये विभागलेला ९ वर्षांचा रचनात्मक कार्यक्रम. सत्य, धर्म, शांती, प्रेम आणि अहिंसा ही मूलभूत मानवी मूल्ये शिकावीत व आचरणात आणावीत ह्या उद्धेशाने कार्यक्रमाची रूपरेखा तयार केली आहे.

गट १: ५ ते ७ वर्ष वयोगट

हा काळ कृती करण्याचा व घडवण्याचा आहे. “लवकर निघा, सावकाश हाका व सुरक्षित पोहचा” हे आपल्या स्वामींचे दिव्य वचन आहे. ह्याच दृष्टिकोनातून मुले वयाच्या पाचव्या वयात (लहान वयात) ह्या कार्यक्रमात प्रवेश घेतात. जर लहान वयात मानवी उत्कृष्टतेचे बीज बोवले तर त्याला मूल्यांची मुळे फुटतात व ती जीवनभर त्यांच्या लक्षात राहतात व त्यांचे अनुसरण केले जाते. ह्या वयात मुलांना काहीतरी करायचे असते बनवायचे असते म्हणून बालविकास गुरु तोंडी सांगण्यापेक्षा चित्रांद्वारे, प्रात्यक्षिके, खेळ, तक्ते, सामूहिक कृती, रोल प्ले (नाटिका) मनोवृत्तीची चाचणी ह्या गोष्टींवर जास्त भर देतात

गट २:८ ते १० वयोगट

ही अवस्था कार्य करण्याची व योजना आखण्याची आहे. ग्रूप १ मध्ये जी पायाभरणी केलेली असते ती आता आकारास येऊ लागते ह्या अवस्थेत विद्यार्थी केवळ कथा, गीते, सामूहिक खेळ ह्याने खुश नसतात तर त्यांना त्यांच्या कांचना व जिज्ञासापुर्ती ह्याहून अधिक काही हवे असते, त्यांना विचारांसाठी खाद्य हवे असते, मुलांना मनावर विजय, इन्द्रियावर नियंत्रण, तसेच ५ डी चा विकास करण्यासाठी ५ तंत्रे वापरली जातात. अशा तऱ्हेने उच्चार व आचार ह्यामधील एकसूत्रतेचा पाया घातला जातो. ग्रुप २च्या पातळीवर मुलांना ज्यामध्ये रस आहे व ज्याची आवड आहे ती जिवंत ठेवण्यावर गुरूंचा विशेष भर असतो

गट ३: ११ ते १३ वयोगट

हे, योजना बनवण्याचे व प्राप्त करण्याचे वय आहे. ह्या वयात जीवनातील वेगवेगळ्या परिस्थितीत मूल्यांचा वापर करण्यास सुरुवात होते ह्या अवस्थेत विद्यार्थ्यांना ते जे शिकले आहेत त्याचा सराव करण्याची व त्याची चाचणी देण्याची इच्छा असते म्हणून गुरु, त्यांनी वर्गामध्ये, कैंपसमध्ये वा संघटनेच्या प्रकल्प कार्याद्वारे वा अभ्यासवर्गाद्वारे शिकून जे आत्मसात केले आहे, त्याचा सराव करण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध करून देतात. ग्रुप ३ च्या वर्गात आल्यानंतर त्यांना गुरुचे स्थान आई व शिक्षक ह्याच्याहून महत्त्वाचे वाटते. गुरु त्यांच्या जीवनात मैत्रीण, त्यांची गुपिते सांगू शकतील अशी जिवलग सखी वा त्यांच्या मनातील गरजा ओळखून असणारी,अशा विविध भूमिका करते

अभ्यासक्रमातील महत्त्वाचे मुद्धे
(पहिल्या वर्षी चे कायम टिकते)
  • विविध देवदेवतांचे सोपे श्लोक.
  • मूल्याधिष्टीत कथा.
  • नामावली भजने/ मूल्याधिष्टीत गीते
  • भगवान श्री सत्य साई बाबांच्या जीवनाचा परिचय
(२ आकडी वय ज्ञानसंपन्नतेचे वय)
  • विविध देवदेवतांचे सोपे श्लोक, भगवद गीता ह्यामधील निवडक श्लोक
  • रामायण आणि महाभारत ह्यामधील कथाभाग निवडणे
  • नामवली भजने / मूल्याधिष्ठित गीते
  • संतमहात्मे, महापुरुषांच्या कथा आणि सर्वधर्म एकटा
  • सर्वधर्म एकता
  • भगवान श्री सत्य साई बाबांचे जीवन आणि शिकवण
(वयोगट पौगंडावस्था – पेशवे वय)
  • भजगोविंदम आणि भगवद गीता ह्यामधील निवडक श्लोक
  • रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद ह्यांच्यासारख्या महापुरुषांचे जीवन चरित्र.
  • भजने/ मूल्याधिष्ठित गीते आणि भारतीय संस्कृती आणि अध्यात्म.
  • श्री सत्य साई सेवा संघटनेच्या मानवहितकारी कार्याचा प्रत्यक्ष अनुभवाचा परिचय
परिवर्तन घडविणे हा उद्देश ठेवून केवळ माहिती मिळवून देणे या उद्देशाने नव्हे.
  • श्री सत्यसाई बालविकासचे हे ध्येय आहे की शुद्ध आणि निर्मळ जाणीव असणाऱ्या मुलांच्या आणि मुलींच्या पीढ्या तयार  करणे.
  • येथे मुलांच्या डोक्यामध्ये अति माहिती भरणे यावर भर नसतो तर मुलांमध्ये अंगभूत , आंतरिक परिवर्तन घडविणे यावर लक्ष केंद्रित केले जाते.
  • रिझल्ट म्हणजे केवळ प्रगती पुस्तक आणि मूल्यमापन शीट्स नव्हेत तर मुलांच्या दैनंदिन जीवनातील आचरणामध्ये झालेल्या महत्त्वाच्या बदलांमुळे त्यांच्या अंतरंगात आणि त्यांच्या आजूबाजूला दिसून येणाऱ्या एकतेमधून रिझल्ट पाहिले जातात.
  • जे मूल नियमितपणे बालविकासच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेते आणि बालविकासचा आठवडा वर्ग चुकवत नाही त्या मुलाच्या आचरणामध्ये सकारात्मक बदल, तसेच पुढे दिल्याप्रमाणे त्याची वृत्ती, कल दिसून येणारच.
अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य
  • वर्गामध्ये पोशाखाची शिस्त पाळली जाते तसेच मुले आणि मुली ह्यांच्यासाठी वर्गामध्ये वेगळी बैठक व्यवस्था असते.
  • वर्गाबाहेर पादत्राणांसाठी व्यवस्था.
  • ह्या शिस्तीचे इतर ठिकाणीही पालन केले जाते. उदा. घरी/ इतर वर्गांमध्ये इ.
  • पालकांविषयी आदरभाव आणि दिवसभर प्रार्थनाच्याद्वारे (प्रातःकाळी, जेवणाअगोदर व रात्री) परमेश्वराचे स्मरण.
  • सर्वांबरोबर वाटून घेणे व सर्वांविषयी आस्था हि मूल्ये ग्रहण करतात.
  • केवळ परमेश्वर आपला खरा मित्र आहे असे मानतात.
श्री सत्य साई बालविकास गट २ पूर्ण झाल्यावर
  • दैनंदिन जीवनात भगवद गीतेची शिकवण आचरणात आणणे.
  • इतर धर्मातील महत्वपूर्ण मुद्धे व आचार पद्धती समजून घेऊन त्याची प्रशंसा करणे. सर्व उत्सव साजरे करणे.
  • आपल्यामधील अंतरात्म्याचा आवाज ऐकण्यास शिकणे आणि योग्य व अयोग्य ह्यामधील भेद जाणणे.
  • ५ ‘D’ च्या भूमिकेचा परिचय १) भक्ती (Devotion) २) विवेक (Discrimination) ३) शिस्त (Discipline) ४) दृढ निश्चय (Determination) ५) दैनंदिन जीवनातील कर्तव्ये (Duty).
  • आपले सदैव अवलोकन करणाऱ्या व मार्गदर्शन करणाऱ्या परमेश्वराचा गुरु आणि सल्लागार म्हणून स्वीकार करणे.
श्री सत्य साई बालविकास गट ३ पूर्ण झाल्यावर
  • भोवताली असणाऱ्या प्रत्येकामध्ये व प्रत्येक गोष्टीमध्ये दिव्यत्व पाहण्यास शिकणे.
  • मानवी जीवनाचे सार व उद्देश ह्याचे आत्मनिरीक्षण करणे (भजगोविंदम मधील श्लोकांचा व्यवहारात वापर).
  • जीवनामध्ये उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करा व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पद्धतींचा अंगीकार करा (भगवद गीतेच्या श्लोकानुसार आचरण).
  • आपल्या देशात विभिन्न, रूढी, परंपरा आहेत. तसेच विभिन्न सांस्कृतिक चालीरिती आहेत. विविधतेतील एकात्मतेचा व दिव्यत्वाचा मुख्य गाभा ओळखणे.
  • इच्छांवर नियंत्रण आचरणात आणले पाहिजे.
  • विचार, श्वास आणि काल ह्यांच्या सुव्यवस्थापनाद्वारे त्यांच्या व्यक्तित्वाची जडणगडन करण्यासाठी आवश्यक ती कौशले वर्धित करणे
  • देशभक्ती आणि मातृभूमी प्रति असलेल्या प्रेमातून सामाजिक सेवेमध्ये सहभागी झाल्याने नैतिक व सामाजिक बांधिलकीची जाण विकसित होईल
  • शाळा, घर व समाजामध्ये योग्य तऱ्हेने कर्तव्य पालन, ह्यांच्या सुव्यवस्थापनाद्वारे त्यांच्या व्यक्तित्वाची जडणगडन करण्यासाठी आवश्यक ती कौशले वर्धित करणे.
  • चांगल्या प्रकारे समस्या सोडवण्याचे, तसेच व्यवस्थापन/नेतृत्व इ. कौशले विकसित करणे. ‘जीवन खेळ आहे’, ‘तो खेळा’ आणि ‘जीवन एक आव्हान आहे’, ‘त्याला सामोरे जा’, ह्याचा खरा आशय समजून घेणे
  • महावाक्यांचे महत्त्व बिंबवण्याच्या प्रयत्नांची परिणती ‘अहं ब्रह्मस्मि’ मध्ये होते.

वरील ठळक मुद्धे म्हणजे ह्या रचनात्मक दिव्या कार्यक्रमाच्या प्रत्येक स्तरावर, मुलांमध्ये अपेक्षित असणाऱ्या परिवर्तनाचे फक्त काही महत्वाचे मुद्धे आहेत. त्याची परिपूर्ण यादी नव्हे. म्हणून प्रत्येक मुलामध्ये मानवी मूल्यांचा विकास करणे, मूल्यांचे दैनंदिन जीवनात अनुसरण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांचा विकास करणे व त्यायोगे, व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय अशा विविध स्तरांवर ताळमेळ साधण्यास हातभार लावणे हे श्री सत्यसाई बालविकासचे व्यापक उध्दीस्ट आहे.

  • मानवी मूल्यांचा विकास करणे
  • त्यांचा दैनंदिन जीवनात अंगीकार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांचा विकास करणे व
  • त्यातून वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय सुसंवादीत्वास बढावा देणे.

“श्री सत्य साई सेवा संघटनेतर्फे बालविकास वर्ग खालीलप्रमाणे आयोजित केले जातात. वैश्विक कार्याचा एक भाग समजून आजच्या मुलांना उद्याच्या समाजाचे दीपस्तंभ बनविण्यासाठी आत्मविचा रणा आणि आत्मशोधाच्या पथावर मुलांना मार्गदर्शन केले जाते हे कार्य सेवा समजून केल्यामुळे बालविकास वर्गासाठी फी आकारली जात नाही.”

जी मुले बालविकास वर्गात नियमित पणे हजर असतात आणि ९ वर्षाचा हा कार्यक्रम पूर्ण करतात त्यांना ९ व्या वर्षाच्या अखेरीस ‘श्री सत्य साई शिक्षण पदविका’ प्रदान केली जाते.

श्री सत्य साई बालविकास कार्यक्रमात पालकांची भूमिका

मानवी मूल्यांच्या विकासावर यथोचित भर न देता केवळ ज्ञानास विखासर्हता दिली गेली हे आजच्या समाजातील बहुतांश समस्यांचे मूळ आहे. अशा दुर्दैवी नवीन प्रथांचा जगामधील तरुणांवर होणार परिणाम कमी कारवाईचा श्री सत्यसाई बालविकास कार्यक्रम शोध घेत आहे. श्री सत्यसाई बालविकास कार्यक्रमात ‘पालकत्व’ अत्यंत महत्वाच्या भूमिकेत आहे. श्री सत्यसाई पालकत्व कार्यक्रम, प्रसारमाध्याने व उपभोक्तावादाच्या दुष्परिणामांमुळे मुलांना तोंड द्यावे लागणाऱ्या आव्हानाविषयी पालकांना जागरूक बनवतो आणि मानवी मूल्यशिक्षणाचे तज्ज्ञ म्हणून त्यांच्या भूमिकेवर विशेष भर देतो. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, पालकांकडून खाली दिलेल्या मुद्यांवर किमान आवश्यक वचनबद्धता अत्यंत जरुरीची आहे.

  • ह्या नऊ वर्षीय रचनात्मक कार्यक्रमासाठी पूर्णपणे वचनबद्ध
  • दर साप्ताहिक वर्गासाठी त्यांच्या मुलांचा नियमित सक्रिय सहभाग असेल ह्याची खबरदारी घेणे
  • मूल्याधिष्ठित बालविकास कार्यक्रमा विषयी पूर्ण श्रद्धा हवी.
  • त्या मूल्यांचे घरांमध्येही अनुसरण करण्यास भाग पडावे व त्याचा पुन्हा पुन्हा उच्चार करने
  • ह्या पूर्णपणे विनामूल्य सेवेची उदात्तता समजून घेणे
  • ठराविक कालावधीने अभिप्राय
  • मुलांच्या प्रागितिची चर्चा करण्यासाठी पालक संपर्क कार्यक्रमात सहभाग
  • कौटुंबिक नातीसंबंधसुधारण्याच्या प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी पालकत्व कार्यक्रमात सहभाग
समग्र व एकात्मिक व्यक्तिमत्व विकास

अशा तऱ्हेने श्री सत्य साई बालविकास कार्यक्रमाद्वारे मुलांचा खात्रीने सर्वांगीण विकास होतो

  • शारीरिक,
  • बौद्धीक,
  • भावनिक,
  • मानसिक व
  • अध्यात्मिक

बहुआयामी पैलू असलेला श्री सत्यसाई बालविकास कार्यक्रम, प्रत्येक बालक, विध्यार्थी, तरुण ह्यांच्यामधील मानवी उत्कृष्टता बाहेर काढण्याची तसेच त्यांच्यातील प्रत्येक जण दिव्यत्व आहे ह्याच्या बोध करून देण्याची व त्यांच्यातील मानवी मूल्ये बाहेर काढून,दैनंदिन जीवनात आचरणात आणण्यासाठी प्रवृत्त करण्याची खात्री देतो. श्री सत्यसाई आत्मोद्भव शिक्षणाच्या तत्वज्ञानाद्वारे भगवान बाबांनी दिलेला हा संदेश आहे.

चला आपण सर्वजण हातात हात गुंफून एकत्र कार्य करू या....

चित्र संदर्भ: साई स्पिरीच्युअल् एज्युकेशन टीचर्स मॅन्युअल.USA 3री आवृत्ती रिविजन 2011

#iguru_dlh_678f7177114b1 .dlh_subtitle {color: #114c56;}#iguru_dlh_678f71771591c .dlh_subtitle {color: #ffa64d;}#iguru_dlh_678f71771ab40 .dlh_subtitle {color: #ffa64d;}#iguru_dlh_678f71771b709 .dlh_subtitle {color: #ffa64d;}#iguru_dlh_678f717724350 .dlh_subtitle {color: #ffa64d;}#iguru_dlh_678f717724825 .dlh_subtitle {color: #ffa64d;}#iguru_dlh_678f717724d22 .dlh_subtitle {color: #ffa64d;}
error: