गोविंद कृष्ण विठ्ठले
ऑडिओ
भजनाचे बोल
- गोविंद कृष्ण विठ्ठले
- वेणुगोपाल कृष्ण विठ्ठले
- रंग रंग विठ्ठले
- श्री पांडुरंग विठ्ठले
अर्थ
कृष्णाची स्तुती करणारे असे हे भजन असून यामध्ये कृष्णाच्या अनेक नामांचा उल्लेख केला आहे. तो गोविंद आहे, विठ्ठल आहे, वेणु गोपाल आहे आणि पांडुरंग आहे.
व्हिडिओ
स्पष्टीकरण
गोविंद | हे कृष्णाचे एक नाव आहे याचा अर्थ असा आहे की ज्याचे गाई – गुरांवर स्वामीत्व आहे |
---|---|
कृष्ण | म्हणजे जो आकर्षित करतो तो (कृष – या धातू पासून आलेला शब्द – जसा आकर्षित मध्ये आहे, म्हणजे आकर्षित करण्याची शक्ती) कृष्ण म्हणजे जो संपुर्ण विश्वाला आकर्षित करतो तो |
विठ्ठले | येथे “विठ्ठ” मधून वीट हा शब्दा निर्देशित होतो. म्हणून या शब्दामधून विटेवर उभा असलेला भगवंत विठ्ठल दर्शवला आहे. |
वेणुगोपाल | वेणु म्हणजे बासरी गोपाल हे भगवान कृष्णाचे; एक नाव आहे ज्याचा अर्थ जो गाई गुरांचे पालन करतो तो. लहान मुलगा असतांना कृष्णाने वृंदावनच्या रानामध्ये गाई गुरांची राखण केली होती. त्यांचे पालन केले होते. संपूर्ण विश्वाचा स्वामी म्हणून तो सर्व जीवांचे रक्षण करतो. त्यांना मार्ग दाखवितो आणि त्यांचे पालनपोषण करतो. |
रंग | या शब्दातून भगवान विष्णुंचे गुण व्यक्त होतात, पांडुरंग या शब्दाचेही हे त्रोटक स्वरुप आहे. तसेच रंगा म्हणजे, जो सर्वांवर समान प्रेम करतो तो. |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 2
-
उपक्रम
-
पुढील वाचन