मुलांना सतत नवीन अमूर्त काल्पनांचा परिचय करुन दिला जातो. जे त्यांना त्यांच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन स्मृतीमध्ये माहिती जतन करुन ठेवण्यासाठी आवश्यक असतात. म्हणून पद्धतशीर रचना केलेल्या वस्तूंच्या खेळात स्मृति कौशल्ये अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जातात.
फायदे:
स्मरणशक्तीचे खेळ मुलांना अल्पविराम घेण्यास, लक्ष केंद्रित करण्यास, विचार करण्यास आणि स्मरणशक्तीस ताण देण्यास भाग पाडतात आणि त्याद्वारे त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये, धारणाशक्ती आणि स्मरणशक्तीमध्ये सुधारणा घडून येते. तसेच ते मुलांमधील आकलन क्षमता आणि माहिती प्रक्रिया करण्यासाठी योग्यता ह्यामध्ये सुधारणा घडवून आणतात.
गुरुंसाठी सूचना
मुलांची दृश्य, श्रवण स्मृती, अनुक्रमिक स्मृती आणि संवेदनात्मक स्मृती उत्तेजित करण्यासाठी, गुरुंनी नमुन्यादाखल दिलेल्या खेळांशी समान असलेले, मुलांना मजा वाटेल असे स्मरणशक्ती खेळ तयार करावेत