धर्म हा कोठून आयात केलेला नाही वा आव्हानांद्वारे त्याचा प्रभाव कमी होत नाही. जर मनुष्य धर्मांचे आचरण करत असेल तर त्याने स्वतःशी प्रामाणिक असायला हवे. सत्यसाई बाबा म्हणतात, “जो कोणी धर्मापासून ढळतो तो अधर्म करतो.
सदैव धार्मिक असण्यासाठी मनुष्याने त्याच्या अंतरातील परमेश्वराचा आवाज ऐकला पाहिजे. तो आवाज मनुष्याला चांगले वाईट ह्यामधील भेद ओळखण्यात प्रोत्साहित करतो”.
मनुष्याने उदरनिर्वाहासाठी तसेच संसारीक कर्तव्ये निभावताना योग्य मार्गाचा अंगीकार करण्यासाठी जागरूक राहिले पाहिजे.
हया विभागातील कथा उदा.”घाई म्हणजे अपव्यय” ही कथा धर्माचे आचरण गरजेचे आहे हे दर्शवते. भगवान जसे म्हणतात की नेहमी सतर्क राहिले पाहिजे उदा. समयसूचकता असायला हवी ज्यायोगे तो वा ती सदाचरणी राहील आणि शांतीही लाभेल. दुसऱ्या कथेतून समयसूचकतेचे एक साधे परंतु सुंदर उदाहरण दिले आहे.
पुढील कथा ‘कोणतेही काम उच्च व हीन दर्जाचे नसते.’ जॉर्ज वॉशिंग्टन ह्यानी त्यांच्या दयाळू कृतीमधून एका उद्धट कॅप्टनला प्रेमाचा धडा कसा दिला हे सांगणारी ही कथा आहे.
रामकृष्णांच्या जीवनातील एक प्रसंगावर आधारित ‘दुसऱ्याने उपदेश करण्या अगोदर स्वतः त्यांचे आचरण करा’ ही कथा नैतिकता (शांती) व नेतृत्व (सदाचार) ही मूल्ये शिकवते.
त्याच प्रमाणे ‘एकाग्रतेचे महत्त्व’ ह्या कथेमध्ये स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील दोन वेगळ्या प्रसंगांचे कथन केले आहे ही कथा आपल्याला एकाग्रतेचे सामर्थ्य (शांती) आणि नेतृत्व (सदाचार) ह्याविषयी शिकवते.