ज्या कथांमध्ये दोन मूल्यांचा अंतर्भाव आहे. त्या कथांची वेगळी सूची बनवली आहे. सत्य हे मानवी जीवनाचे तत्त्व आहे. सत्यातून सदाचरणाची निर्मिती होते. सदाचरण शांतीकडे घेऊन जाते आणि पाठोपाठ प्रेमही येते. अशा तऱ्हने प्रत्येक गोष्ट सत्यातून निर्माण होते. सत्यामध्ये प्रत्येक गोष्ट विरघळून जाते. सत्याने व्यापले नाही अशी एकही जागा नाही.
जेव्हा सत्य आचरणात आणले जाते तेव्हा ते सदाचरण बनते. ह्या विभागात सूचिबद्ध केलेली ‘सत्य हाच परमेश्वर’ ह्या कथेत स्वातंत्र्यसैनिक बाळ गंगाधर टिळक हयांच्या बालपणातील धाडसी कृतींचे वर्णन केले आहे.