अन्न प्रार्थना
ऑडिओ-1
श्लोकाचे बोल
- ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतमI
- ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिनाII
अर्थ–
ब्रह्म आहुती आहे, ब्रह्म हवि (तूप) आहे. ब्रह्माकडूनच ब्रह्माग्नित आहुती दिली जाते. ह्या सर्व क्रियांमध्ये जो ब्रह्माला पाहतो तो निःसंशय ब्रह्माला प्राप्त होतो
ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर
ज्या पळीद्वारे आहुती दिली जाते ती पळी ब्रह्म आहे.
आहुती सुद्धा ब्रह्म आहे.
ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम
पवित्र अग्नी ब्रह्म आहे अर्पण करण्याची क्रिया ब्रह्म आहे.
ब्रह्मैव तेन गन्तव्यं
अर्पण (त्याग) करणारा ब्रह्म आहे.
ब्रहमकर्मसमाधिना
अंतिम ध्येयासाठी केलेले संपूर्ण यज्ञकर्म ब्रह्म आहे.
ऑडिओ- 2
श्लोकाचे बोल
- अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः।।
- प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्।।
अर्थ
वैश्वानर नावाचा अग्नी होऊन मी प्राण्यांच्या शरीरात राहतो. प्राण आणि अपान (श्वास आणि उः श्वास) यांच्याशी संबध्द होऊन मी चतुर्विध अन्नाच पचन करतो. प्राण आणि अपान ह्या धारणा आणि उत्सर्जनाच्या दोन शारीरिक क्रिया आहेत. येथे सनातन सत्य परम जीवनतत्त्व म्हणून दर्शवले आहे जे शरीरामध्ये स्पंद पावताना स्वतःला ‘वैश्वानर’ (अन्न पचन करणारा अग्नि) म्हणून प्रकट करते व ग्रहण केलेले अन्न एकत्रित करते. पचन करणे, एकत्रित करणे व पोषक तत्त्वे शरीरात शोषून घेणे ह्या सर्व प्रक्रिया झाल्यानंतर जीवनाचे ते दिव्य स्फुल्लिंग, शरीरात पचन न झालेले अन्न व इतर अनावश्यक घटक बाहेर फेकण्याची (अपान) क्षमता आतड्यांना प्रदान करते.
अहं वैश्वानरो भूत्वा
मी सर्व प्राणिमात्रांमध्ये वैश्वानर आहे.
प्राणिनां देहमाश्रितः
मी सर्व जीवांच्या शरीरामध्ये स्थित आहे.
प्राणापानसमायुक्तः
मी प्राण आणि अपानाशी (श्वास-उच्छवासाशी) संयुक्त आहे
पचाम्यन्नं चतुर्विधम्
मी चार प्रकारच्या अन्नाचे पचन करतो.
१ ॐकार
असतोमा—- श्लोक म्हणून भोजनास सुरुवात करावी.
चार प्रकारच्या अन्नाचे:
१) खाद्य- जो पदार्थ तोडून आणि चावून आपण खातो.
२) चोष्य- जो पदार्थ आपण चघळून आणि चोखून खातो.
३) लेह्य- जो पदार्थ जिभेच्या मदतीने आपण गिळून टाकतो. थोडे घट्ट पातळ पदार्थ, आमरस वगैरे.
४) पेय- पातळ पदार्थ जे आपण गिळून टाकतो.
अन्नाच्या बाबतीत आवश्यक असणाऱ्या तीन प्रकारच्या शुध्दी
- पात्र शुध्दी
- पाक शुध्दी
- पदार्थ शुध्दी
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 3
-
EXPLANATION
-
पुढील वाचन