- स्वतःची कर्तव्ये पार पाडताना येणारा ताण कमी होण्यासाठी ही कर्तव्यकर्मे परमेश्वराचे नाम घेत पार पाडावीत
- राग व ताल योग्य असण्यावर कीर्तन अवलंबून नाही. ते प्रेमयुक्त हर्षभराने केले पाहिजे किंवा देवाला उत्स्फूर्त समर्पण म्हणून आले पाहिजे.
- दुष्ट माणूस दुसऱ्याच्या क्षुल्लक दोषांकडे जागरूकपणे पाहत असतो आणि स्वतःच्या ढोबळ दोषांकडे ते त्याला माहीत असूनही दुर्लक्ष करतो.
- जसे सापांना दूध पाजले तर त्यांचे विष वाढते त्याप्रमाणे दुष्ट माणसांना मदत केली तर दुष्परिणाम होतात.
- आपण कोणते नाम घेतो हे महत्त्वाचे नाही. ते आपण नियमितप्रमाणे व सातत्याने घेतले पाहिजे.
- फलासक्ती ही खरोखर आपण आणि भगवंत यांच्यातील अडथळा आहे. उलट निष्पाप भगवतप्रेम सर्व काही प्राप्त करून देते.
- कर्माचे फळ यथाकाळ मिळेल. देवाला अर्पण केलेले अथवा कोणत्याही निःस्वार्थी हेतूने केलेले कर्म साहजिकचक स्वार्थी हेतूने केलेल्या कर्मापेक्षा चांगली फळे देते.
- क्रोध आणि असहिष्णुता हे योग्य आकलनाचे जुळे शत्रू आहेत.
- प्रत्येक व्यक्तीच्या सामर्थ्याला मर्यादा असतात आणि ज्याक्षणी आपण कोणतेही कार्य स्वीकारू शकतो असा रूबाब तो करू लागतो त्याक्षणी त्याचे गर्वहरण करायला भगवंत तिथे असतोच.
- जेव्हा जेव्हा मी एखादा चुकणारा माणूस पाहतो तेव्हा मी स्वतःशीच म्हणतो की मीही चुका केल्या आहेत. जेव्हा मी एखादा हावरा माणूस बघतो तेव्हा मी स्वतःशीच म्हणतो की मीही एके काळी असाच होतो. अशा तऱ्हेने जगातील प्रत्येकाशी नाते आहे असे माला वाटते आणि आपल्यातील सगळ्यात सामान्य मनुष्य सुखी झाल्याखेरीज मी सुखी होऊ शकणार नाही असे मला वाटते.
- एका काळी मला असे वाटत होते की देव सत्य आहे. आता मला कळले आहे की सत्यच देव आहे.
- आपल्या दैनंदिन कर्मामध्ये व्यवस्थितपणा, शांती आणि जबाबदारपणा आणण्यासाठी प्रार्थना हा एकच उपाय आहे. ती सकाळची किल्ली व संध्याकाळची कडी आहे.
- माझा धर्म मला असे शिकवतो की जेव्हा जेव्हा आपण बाजूला करु शकत नाही अशा खिन्नतेने ग्रासतो तेव्हा तेव्हा आपण उपोषण व प्रार्थना केली पाहिजे. जीवाला प्रार्थना जितकी आवश्यक आहे तितके काही शरीराला अन्न आवश्यक नाही.
- प्रार्थना म्हणजे याचना नव्हे, ती जीवाची आर्तता आहे. स्वसमर्पणाचे उदात्त व धैर्याचे कर्म शिकण्याचा प्रार्थना हा पहिला व शेवटला धडा आहे.
- अहिंसा ही क्षमाशीलतेची अंतिम मर्यादा आहे.
- प्रयत्नात समाधान आहे, प्राप्तीत नव्हे. समग्र प्रयत्न म्हणजे संपूर्ण विजय.
- सारे जग उपभोगासाठी आपलेच आहे पण काही मागू नका. मागणे ही दुर्बलता आहे. ते आपल्याला भिकारी बनविते आणि आपण तर राजपुत्र आहोत.
रत्ने
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 0
The curriculum is empty