हर शिव शंकर
ऑडिओ
भजनाचे बोल
- हर शिव शंकर शशांक शेखर
- हर भम हर भम भम भम बोलो
- भवा भयंकर गिरिजा शंकर
- धिमी धिमी धिमी तक नर्तन खेलो
भजनाचा अर्थ
वाईटाचा संहार करणारे, जे मंगल आहे ते प्रदान करणारे भगवान शिव मस्तकावर चंद्रकोर धारण करतात ते पार्वतीचे स्वामी आहेत . आपल्या भौतिक बंधांचा ते नाश करतात. त्यांचे नृत्य म्हणजे विश्वनाट्य आहे. ते नृत्य करत असताना त्यांच्या पायातील घुंगरांचा आणि दमरूचा आवाज ऐका.
व्हिडिओ
स्पष्टीकरण
हर | भगवान शिवाचे एक नाव – त्याचा अर्थ जो संहार करतो |
---|---|
शिव | शब्दशः अर्थ – मांगल्य वा भद्रता |
शंकर | भगवान शिवाचे एक नाव – शंकर म्हणजे जो आनंद आणि शांती प्रदान करतो |
शशांक | चंद्र |
शेखर | मस्तकावर कोणतेही आभूषण धारण करणारा असा एक अर्थ आहे आणि दुसरा अर्थ स्वामी |
बोलो | म्हणा, उच्चारण करा |
भवा भयंकर | भवा – भौतिक अस्तित्व, अभयंकर – अभय + कर – येथे अभय म्हणजे निर्भयता, भयापासून मुक्ती, कर – देणारा भवाभयंकर म्हणजे प्रभु जो भौतिक जीवन हाताळण्यासाठी आपल्याला निर्भयता प्रदान करतो |
गिरिजा | हिमालयावर राज्य करणाऱ्या हिमवानाची पुत्री माता पार्वती म्हणून तिचे नाव गिरिजा पडले. |
नर्तन | नृत्य |
खेलो | खेळा |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 0
The curriculum is empty