जय जय जय मनमोहना
ऑडिओ
भजनाचे बोल
- जय जय जय मनमोहना
- जय जय जय मधुसूदना
- माधवा केशवा
- केशवा माधवा
- गोपाला गोपालना
भजनाचा अर्थ
मनाला मोहित करणाऱ्या प्रभुचा जयजयकार असो. लक्ष्मीचा पती स्वामी आणि गाईंचा रक्षण कर्ता, असुरांचा नाश करणाऱ्या भगवान कृष्णांचा जयजयकार असो.!
स्पष्टीकरण
जय | जयजयकार |
---|---|
मनमोहना | मन – मन, मोहन – मोहिनी घालणारा |
मधुसूदना | मधु, राक्षसाचे नाव सूदन – वध. मधुसूदन – कृष्णाचे एक नाव, मधु नावाच्या राक्षसाचा कृष्णाने वध केला, हे ह्या नावामधून सूचित होते. |
माधव | भगवान विष्णु वा कृष्णाचे अजून एक नाव मा + धव (‘मा’ चा संदर्भ लक्ष्मीशी आहे आणि ‘धव’ म्हणजे पती – लक्ष्मीपती) |
केशव | भगवान विष्णू वा कृष्णाचे एक नाव ह्या नावाचा अर्थ ‘जो क्लेश हरण करतो’ आणि दुसरा अर्थ ‘ज्याचे सुंदर काळेभोर कुरळे केस आहेत तो’ ह्या शब्दाची व्युत्पत्ती केस (केश) ह्या शब्दापासून झाली आहे. केशव हा शब्द, कृष्णावतारात कृष्णाने केशी नावाच्या राक्षसाचा वध केल्याचे सुचित करतो. |
गोपाला | गो – गाय. पाला – रक्षणकर्ता (राखणारा). हे नाव कृष्णवताराशी संबंधित आहे. कारण तेव्हा कृष्णाने गुराख्याची भूमिका केली होती. |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 2
-
उपक्रम
-
पुढील वाचन