कराग्रे वसते
ऑडिओ
श्लोकाचे बोल
- कराग्रे वसते लक्ष्मी:
- करमध्ये सरस्वती
- कर मूले तू गोविंद:
- प्रभाते कर दर्शनं
अर्थ
आपल्या तळहातांच्या बोटांच्या अग्रभागी, टोकावर, संपत्तीची देवी लक्ष्मी राहते, तळहातांच्या मध्यभागी विद्यादेवी, सरस्वती राहते आणि तळहातांच्या मुळाशी मात्र साक्षात भगवान विष्णूंचे, की जो सर्व प्राणिमात्रांचे संरक्षण करतो, वास्तव्य आहे (आणि म्हणून या प्रकारचा विचार करत व डोळ्यांपुढे प्रतिमा आणत) पहाटेच्या वेळी तळहातांचे दर्शन घ्यावे.
Vedio
स्पष्टीकरण
कर + अग्रे | हाताच्या बोटांवर |
---|---|
वसते | राहते |
लक्ष्मी | संपत्तीची देवता, लक्ष्मी देवी |
करमध्ये | तळहाताच्या मध्यभागी |
सरस्वती | ज्ञान आणि विद्वत्तेची देवता सरस्वती देवी, विद्यादेवी |
करमूले | तळहाताच्या मुळाशी, आरंभापाशी (तळ हात सुरु होतो त्याजागी) |
तु | मात्र |
गोविंद: | भगवान विष्णू, प्रत्येक प्राण्याचा रक्षणकर्ता व पालनकर्ता |
प्रभाते | पहाटे, ज्यावेळी आपण झोपेतून जागे होतो, प्रभातकाल |
करदर्शनम | तळहातांचे दर्शन |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 2
-
उपक्रम
-
पुढील माहिती