अहिंसा ही सत्य, धर्म, प्रेम आणि शांती उरलेल्या चार मूल्यांचा अंतर्प्रवाह आहे. अहिंसा म्हणजे प्रेम आणि सर्व जीवांप्रती आदर ह्याचे नैतिक तत्त्व होय. मानव, पशू, वृक्ष, सरोवर, पर्वत आणि हिमनद्या हे सर्व त्या परम पुरुषाचे अविभाज्य भाग आहेत. ह्याची मनुष्याला जाणीव असणे गरजेचे आहे.
प्रेम + जाणीव = अहिंसा. जर एखाद्या अंध मनुष्याने रस्त्यामध्ये आपल्याला धडक दिली तर तो त्याचा दोष नाही कारण तो काय करतो ते त्याला माहीत नसते. त्याचप्रमाणे जे सत्याप्रती अंध आहेत, अनभिज्ञ आहेत त्यांना आपण क्षमा केली पाहिजे. त्यांच्या बाबतीत हा दृष्टिकोन ठेवून, त्यांनी केलेला अपमान वा दुखापत ह्यावर हिंसक प्रतिक्रिया न देता ते सहन केले पाहिजे. समस्त सृष्टीतील एकत्वाच्या जाणिवेशिवाय इतरांची चूकभूल माफ करणे वा विसरणे कदाचित आपल्याला शक्य होणार नाही.
“जे नको आहे त्याचा अपव्यय करू नका” या गोष्टीतून, अहिंसेचे पालन करून सामाजिक जबाबदारींची जाण स्पष्ट करून सांगितली आहे.