अखिल जगातून शांतीसाठी मागणी केली जात आहे. म्हणून विश्वशांतीसाठी नोबेल पारितोषिकही आहे आणि जे स्त्री वा पुरुष विश्वशांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतात त्यांच्यासाठी काही आंतरराष्ट्रीय अधिकृत मान्यता आहेत. आपल्या भगवान बाबांनी शांतीचा शोध घेणाऱ्यांसाठी एक सोपा उपाय सांगितला आहे. ते म्हणतात, ‘मला शांती हवी’ या वाक्यातील मला (मी) आणि हवी हे दोन्ही शब्द हटवा. शांती आपोआप मिळेल. जेव्हा मनुष्याच्या हृदयात शांती भरून राहते तेव्हा तो सुखाने हुरळून जात नाही वा दुःखाने हताश होत नाही; तसेच तो अती महत्त्वाकांक्षी नसतो वा अती आत्मसंतुष्टही नसतो. त्याचे जीवन समतोल असते आणि प्रत्येक गोष्टीचा तो आशीर्वाद मानून स्वीकार करतो.
भगवानांचे स्पष्टीकरण
तुमची इंद्रिये तुमच्या मालकीची आहेत म्हणून त्यांना पूर्ण मोकळीक देणे हा मूर्खपणा आहे. जरी घोडा तुमचा असला तरी घोडेस्वारी करताना तुम्ही लगामावरचे नियंत्रण सोडत नाही. नाहीतर तुम्हाला अपघाताला सामोरे जावे लागेल. त्याचप्रमाणे, तुम्ही म्हणू शकता ‘ही गाडी माझी आहे’ परंतु जर तुम्ही आवश्यक तेथे ब्रेक लावला नाही तर अनर्थ घडेल. इंद्रियांवर ताबा हा केवळ संतमहात्म्यांसाठी नसून समस्त मानवजातीसाठी आवश्यक आहे.
ह्या विभागातील तीन गोष्टींतून आपण शांतीविषयी अधिक जाणून घेऊ या.

 
                                













![Ashtothram [28-54] Sloka](https://sssbalvikas-s3.s3.ap-south-1.amazonaws.com/wp-content/uploads/2021/04/ashtothram-tiles.png)




