प्रेमाविना केलेले कर्तव्य नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे. प्रेमासहित केलेले कर्तव्य वांछनीय आहे परंतु एखाद्या व्यक्तीने केलेल्या प्रेममय कृती ह्या त्याच्या स्वभाव प्रवृत्तीमुळे घडतात, कर्तव्य करणाच्या सत्तेतून नव्हे.अशा कृती खरोखरच दिव्य असतात
जेव्हा एखादी व्यक्ती तिची कर्तव्ये चोख बजावते तेव्हा त्या व्यक्तीस आनंद बहाल केला जातो. काही कर्तव्ये स्वतःप्रती तर काही इतरांप्रती असतात.
परमेश्वराप्रती प्रेम विकसित करुन, आपण स्वतःला पुढील पायरीसाठी तयार करत असतो. ती पुढील पायरी म्हणजे सर्वांमध्ये परमेश्वरास पाहणे व सर्वांवर प्रेम करणे. सेवेमधून परमेश्वराप्रती असणारे प्रेम व्यक्त होते.श्री सत्यसाई बाबांच्या शिकवणीतील, निःस्वार्थ ह्या आध्यात्मिक साधनेची अत्याधिक शिफारस केली आहे.
प्रेम हाच परमेश्वर; परमेश्वर म्हणजेच प्रेम. सर्वोच्च आध्यात्मिक साधनेबद्दल बोलताना स्वामी म्हणतात, “सर्वांवर प्रेम करा, निःस्वार्थ सेवेतून व्यक्त झालेले प्रेम, सेवेचे भक्तीमध्ये परिवर्तन करते.”
खालील दोन सुंदर कथांमध्ये, प्रेमाने धर्माचे अनुसरण करण्याचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले आहे.
- मानवसेवा हीच माधवसेवा.- ह्या कथेतील अब्राहम लिंकन ह्यांच्या जीवनातील एका प्रसंगातून मुलांना सेवेचा खरखुरा अर्थ समजण्यास मदत होते.
- मानवी प्रयत्न दिव्य मदतीस ओढून घेतात- ह्या कथेमधून स्वधर्म आणि भक्ती म्हणजेच देवाप्रती प्रेम ह्या दोन्हीला सारखेच महत्त्व देण्याविषयी सांगितले आहे.