सत्य जेव्हा कृतीमधून व्यक्त होते तेव्हा त्याचे नीतिमान जीवनात रूपांतर होते, सत्य शब्दाशी संबंध असताना सदाचरण ही कृती आहे यावर आधारित ‘सत्यम वद, धर्मम चर’ (सत्य बोला, सदाचरणाने वागा) ही वेदांची शिकवण आहे. सत्याचे आचरण हाच खरा धर्म आहे म्हणून मनुष्याने स्वतःला धर्माप्रती समर्पित करणे अत्यावश्यक आहे, अनिवार्य आहे.
अगदी बालपणापासून सदाचरणाचा अभ्यास केला पाहिजे म्हणजे केवळ व्यक्ती नव्हे तर संपूर्ण राष्ट्र प्रगतीपथावर वाटचाल करेल. जर हृदयात सदाचरण असेल तर तेथे चारित्र्य संपन्नता असेल, जर चारित्र्य संपन्नता असेल तर घरामध्ये सुसंवाद, एकोपा असेल, जर घरामध्ये एकोपा असेल तर राष्ट्रामध्ये सुव्यवस्था असेल,जर राष्ट्रामध्ये सुव्यवस्था असेल तर भूतलावर शांती असेल.
पहिल्या गटातील मुलांच्या मनावर सदाचरणाचे महत्त्व बिंबवण्यासाठी प्रामाणिकता, मानवसेवा हीच माधव सेवा, प्रयत्न करणे ही मानवाची महत्ता, माता पिता चा आदर करणे, ह्यासारख्या उपमुल्यावर आधारित गोष्टी पाहिल्या वर्षा मध्ये समाविष्ट केल्या आहेत.