ज्यामध्ये दोन मूल्य अंतर्भूत आहेत अशा कथांची अशी वेगळी यादी केली आहे. जेव्हा सत्य आचरणात आणले जाते तेव्हा ते सदाचरण बनते. सत्य हे शब्दांमधून व्यक्त केले जाते तर सदाचरण हे कृतीतून व्यक्त होते. म्हणून सदाचरण सत्यावर आधारित असते. सत्याविना सदाचरण असू शकत नाही. सत्याच्या पायाशिवाय सदाचरणाची हवेली बांधली जाऊ शकत नाही.
‘कोणतीही गोष्ट निरूपयोगी नाही’ या नावाच्या कथेतून सत्य आणि सचोटी ह्याविषयी जिज्ञासू वृत्ती दर्शविली जाते.